पाच कथा या श्रृंखलेतील येऊ घातलेला "वारूळ





 राजापूर :- पाच कथा या श्रृंखलेतील "वारूळ" या चित्रपटाच चित्रीकरण राजापूर तालुक्यातील ताम्हाणे या गावी पार पडल, या चित्रपटाची निर्मिती SJFILMS PRODUCTION अंतर्गत होत असुन याच लेखन दिग्दर्शन सुयश जनार्दन जाधव यांनी केल असुन, सहयोगी दिग्दर्शन पराशर नाईक, छायांकन- कुंदैन शानभाग, कलादिग्दर्शन वेशभूषा - साहिल तांबे - प्रतीक्षा जाधव, ध्वनी निलेश निकम तर सहाय्यक दिग्दर्शक- देवेंद्र पवार व साहिल तांबे यांनी केले आहे.

लेखक-दिग्दर्शक सुयश जाधव हे कोकण प्रांतातील करक गावात स्थित आहेत. त्याचं प्रार्थमिक शिक्षण गावातच झाल असुन पुढील शिक्षण नामांकित सर. ज. जी. महाविद्यालयातून झालं आहे. त्यांनी यापूर्वी "काल-स्पंद" "अरण्यका" "स्थाही भ्रमण यांसारख्या लघुपटांची निर्मिती केली असुन त्याची विविध चित्रपट महोत्सवांत दखल घेण्यात आली आहे "स्मृती डोह" या लघुपटाला १०व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात सन्मानित करण्यात आले तसेच नुकत्याच निर्मिलेल्या "तुझ्यातील जनावराला" या धर्म-जात-वर्ण-लिंग-प्रतिष्ठा या आधारानं समाजात होत असणाऱ्या अमानुष अत्याचाराच्या घटनावर (Mob Lynching) भाष्य करणाऱ्या लघुपटाची तमिळनाडूतील सित्तावारस्लन आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट सामाजिक चित्रपट या पुरस्कारान सन्मानित, उटी चित्रपट महोत्सव पुणे चित्रपट महोत्सव यांत अधिकृत निवड होऊन, स्क्रीनिंग करण्यात आलं तर येत्या सप्टेंबर महिन्यात इटलीतील festival del Cinema di Cefalu या चित्रपट महोत्सवात अंतिम यादीत निवड होऊन स्क्रीनिंग होत आहे यात प्रमुख भूमिका प्रीतम जाधव यांनी साकारली आहे.

वारूळ हा चित्रपट Cross Genres या चित्रशैलीत मोडत असुन पाच कथा या श्रृंखलेतील इतर चार कथा सुद्धा याच शैलीत मोडतात. कोकणातील घनदाट जंगल-मुसळधार पाऊस इथल्या दऱ्या-खोऱ्यांतून वाहणाऱ्या नद्या, अशा अनेक घटकांचा इथे वसणाऱ्या प्रत्तेकाच्या जीवनावर खोल प्रभाव आहे. इथला कोणताही घटक निसर्गापासून विलग करता येत नाही त्याप्रमाणे इथला माणूस सुद्धा, याच भीतालात जागो-जागी आढळणारं मुग्यांच वारूळे चित्रपटात एखाद्या रूपकाप्रमाणे माणूस व निसगाँचे न उलगडणारे पैलू उकरण्याचा प्रयत्न करत चित्रपट, त्यातील मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या खोल मनाचा ठाव घेत-घेता काळ आणि भौतालाच्या अंतहीन डोहात घेऊन जात नव्या अध्यायाला जन्म देतो, अशा न उलगडणाऱ्या अमूर्त आशया भोवती चित्रपटाच कथानक घिरट्या घालत!

या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका राघवकुमार यांसारख्या जेष्ठ कलावंताने अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे. अन्य भूमिकांत कल्याणी सखळुनकर, कल्पेश हळदे, प्रीतम जाधव, देवेंद्र पवार, सुकन्या शिंदे, वैशाली यादव, महेंद्र चव्हाण, अभिषेख घाडी, गौरव नवलु करिष्मा अडसूळ, प्रांजल वाफेलकर, आराध्य बोल्ये, श्रेयश बोल्ये, यांनी साकारल्या आहेत. कोकणातील घनदाट जंगल व जोडीला मुसळधार पाउस अशा अत्यंत कठीण व आव्हानात्मक परिस्थितीत चित्रपटाच चित्रीकरण पार पडल, या चित्रपटाशी जोडलेल्या कलावंता बरोबर इतर सर्वांचा चित्रीकरणाचा अनुभव एकाच वेळी अत्यंत दमणूक व समाधान देणारा होता असं कळत.

अत्यंत कलात्मक व प्रायोगिक मांडणीत मोडत असलेल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शका पासून चित्रपटाला जोडलेल्या पडद्यामागील बहुतांश व्यक्ती चित्रकार आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकाला आगळी अनुभूती देईल यात शंका नाही!

टिप्पण्या