संभाजी भिडेंगुरूजीं* *पेक्षा ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न अधिक महत्वाचा.!* *..डाॅ.हंसराज वैद्य.*


*नांदेड दि.3/8/23(प्रतिनिधी)ः*

*ज्येष्ठ नागरिक हा कुटूंब,राज्यच नाही तर राष्ट्राच्या समाज मनाचा आरसा आहे.औषधी संशोधनाच्या क्रांतीकारक घडामोडीमोडी मुळें आपल्याच देशात नव्हे तर संपूर्ण जगातच नवजात बालकांच्या जन्म दरापेक्षांही ज्येष्ठ नागरिक होण्याचा दर जास्त झाला आहे.कारण मृत्यू दर कमी होवून आयुष्यमान वाढले आहे.!ज्येष्ठांची संख्या जशी वाढत आहे, तशे त्यांचे प्रश्नही वाढत आहेत.ज्येष्ठ नागरिक हा जसा कुटुंबाचा आधार वड, तसा समाजाचाही आधार वडच आहे.ज्येष्ठ नागरिक समूह हा ग्रामिण भागातील वस्ती,पालव,तांडा, माडा, झोपडपट्टी व शहरी भागातील झोपड पट्टी आणि चांगल्या सुशिक्षित व सुधारीत वस्त्यांतील प्रत्येक कुटुंबा परत्वे किमान एक ते चार या प्रमाणात आहे.यात विधवा ज्येष्ठ महिलांची संख्या लक्षणिय आहे.ते अत्यंत हालाकिच्या परिस्थित कसे बसे जीवन जगताहेत.एकून जन संख्येच्या जवळ जवळ (नोंदनीकृत व अनोंदनी कृत मिळून)आठरा टक्क्ये हे ज्येष्ठ नागरिक आहेत.ह्या समुहाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्या पासून ते राष्ट्र उभारनींत व राज्यकर्त्ता निर्मितीत ही सक्रिय सहभाग आहे. ज्येष्ठ नागरिक समुह हा अत्यंत सुजान,पोक्त, अनुभवी,प्रामाणिक,निष्प्रूह असून शंभर टक्के मतदान करणारा समुह तथा घटक आहे.सर्वच राष्ट्रीय सणोत्सवात ते सहभागी होतअसतात.पण दुर्दैव असे की राज्य कर्त्यांना नेमका त्यांचाच विसर पडला आहे.राज्य कर्त्यांनां निवडून देणारा समूह आज गरजू असुनही दुर्लक्षित,शोषित, वंचित राहिला आहे.त्यांच्याकडे समाज घटकांचे व राज्य कर्त्यांचेही अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे.समाजातील एक एक ज्येष्ठ नागरिक हा किमान सहा(तोस्वतः,पत्नी,मुलगा,स्नुषा,कन्या व जावाई) मतांचा हुकमी एक्का आहे.एबढेच नव्हे तर एक ज्येष्ठ नागरिक शेकडो मतदात्यांचे मत परिवर्तीत करू शकतो.एकट्या संभाजी भिडेंच्याच मतदानावर सर्व सत्तेतील व सत्तेबाहेरील राज्येकर्ते निवडून दिले जात नाहित.मग त्यांच्यावर एवढा गोंधळ व एवढा गदारोळ व अधिवेशन स्थगाती केली जाताना का दिसत आहे?.बहू मोल वेळ व लाखो रू.चा व्यय होताना का दिसत आहे?.गेली जवळ जवळ पस्तीस वर्ष ज्येष्ठ नागरिक शिखर संघटणा (फेस्काॅम)त्यांचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. पण शासन केवळ आश्वासनच देत आहे. मागण्या मान्य करून अंमलात आनण्यास तयार नाही.त्यांच्या मागण्या न्याय,सामान्य तथा घटणेतील तरतुदीनुसारच आहेत. क्षुल्लक कारणा साठी अधिवेशनात विधान सभेचे कामकाज बंद पाडण्यात व ज्येष्ठांच्या गंभीर तथा ज्वलंत प्रश्नावर विरोधीपक्ष सदस्यांना व राज्यकर्त्यांना चर्चा घडवून न आनण्यात व न सोडविण्यातच धन्यता वाटत असल्याचेच चित्र सध्या तरी दिसून येत आहे.(1)ज्येष्ठ नागरिक धोरण व त्यांच्यासाठींचे कायदे तथा नियमांचे तंतोतंत पालन करण्यात यावे.(2)जागतिक व देशांतर्गत इतर राज्यांत मान्य असलेली वयोमर्यादा वय वर्ष साठच ग्राहय धरून अंमलात आणा व सर्व ज्येष्ठांना सर्व मुलभूत सुविधा द्या.(3)शेजारिल राज्यांप्रमाने फक्त गरजू,दुर्लक्षित, सोषित व वंचित शेतकरी, शेतमजूर तथा कामगार ज्येष्ठ नागरीकांना फक्त दोनदाचे जेवन व चहा पाण्या साठी प्रतिमहा केवळ 3500/-रू मानधन देण्यात यावे. (4)कुशल,लायक तथा पात्र व इच्छुक ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्र निर्मिती कार्यात कमी मोबादल्याने सेवेची संधी देऊन सहभागी करून घेण्यात यावे अदी व इतर मागण्या चालू आधिवेशनात मान्य करून अंमलात आणाव्यात.ज्येष्ठांचे हे प्रलंबित प्रश्न संभाजी भिडेंगुरूजींच्या प्रश्नापेक्षा कितीतरी महत्वाचे तथा जिव्हाळ्याचे आहेत व सोडविल्यास पुण्यासह फलदाईही ठरणारेआहेत.!*

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
मुंबई शहराचा कणा असलेला कामगार मुंबईतून हद्दपार झाला _* अशोक नायगावकर
इमेज