प्रतिनिधी - महेंद्र पुरी हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील महामार्ग पोलिस चौकीचे उद्घाटन व महामार्ग पोलिसांच्या नुतन वाहनाचे उद्घाटन अतिरीक्त पोलिस महासंचालक रविंद्र सिंघल यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. तसेच महामार्ग पोलिस चौकी परिसरात सिंघल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी महामार्ग अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना सिंघल यांनी अधिकारी कर्मचारी यांनी स्वतः हेल्मेट व सिटबेल्ट लावावे ज्यामुळे ईतर नागरिकांमध्ये चांगला मेसेज जाईल. नागरीक सुद्धा वाहतुकीच्या नियमांचे पालन करतील. तसेच महामार्ग पोलिसांनी प्रत्येक शाळेत जाऊन वाहतुक नियमांची जनजागृती करावी तसेच हेल्मेट व सिट बेल्ट लावल्याने अपघातात कसा बचाव होतो याची जनजागृती करावी.
तसेच साहेबांनी स्वतः विद्यार्थी दशेतील आपला अनुभव अधिकारी कर्मचारी यांच्या समोर मांडत मी इंजीनियरिंग ला असतांना मला वाहतुक पोलिसांनी विना हेल्मेट पकडल्यामुळे मी चालान भरले हालाकी माझे वडील पोलिस अधिकारी होते मी कदाचीत माझे चालान चे पेशे वाचवू शकलो असतो परंतु मी तसे केले नाही. चालान फाडल्यानंतर मी नेहमी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले. व सध्या मी स्वतः पोलिस दलात उच्च पदस्थ अधिकारी असुन सुद्धा कार मध्ये मागे बसलो तरी सिट बेल्ट चा नेहमी वापर करतो जेणे करून सामान्य नागरिकांमध्ये याचा चांगला मेसेज जाईल व ते ही नियमांचे पालन करतील. महामार्ग चे अधिकारी कर्मचारी चोविस तास ड्युटीवर असतात टू व्हिलर असो की फोरव्हिलर अपघात नंतर तात्काळ मदत कशी मिळेल याची दक्षता घेण्याच्या सुचना यावेळी अतिरिक्त पोलिस महासंचालक रविंद्र सिंघल यांनी महामार्ग पोलिस अधिकारी कर्मचारी यांना दिल्या.. यावेळी महामार्ग च्या पोलिस अधीक्षक अनिता जमादार, उपाधिक्षक श्रीकांत ढिसले, पोलिस निरीक्षक पठाण, पोलिस निरीक्षक गिरी, पोलिस उपनिरीक्षक उमर शेख, उपनिरीक्षक शैलेश मुदिराज, सहायक पोलिस उपनिरीक्षक पोले, जमादार नितीन जाधव यांच्या सह सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट कामगिरी बद्दल महामार्ग पोलिस चौकीचे जमादार माखने यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले..
addComments
टिप्पणी पोस्ट करा