खेळास करीअर म्हणून पाहावे: डॉ.प्रताप काळे (अप्पर जिल्हाधिकारी)*



परभणी (. ‌‌. ) परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व शिवाजी महाविद्यालय परभणी वतीने दि. २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिना उत्साहात साजरा करण्यात आला. 

या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे म्हणाले राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आपण मेजर ध्यानचंद या थोर व्यक्तिमत्त्वाचे स्मरण करतो. आता क्रीडा क्षेत्रात चांगले दिवस आले आहेत. निरंज चोप्रा यांनी देशाला सुवर्ण पदक मिळवून दिली. तसेच जागतिक पातळीवर नावलौकिक वाढला आहे. खेळाडूंना शासकीय नोकरीत सुध्दा आरक्षण प्राप्त झाले आहे. 

मैदानावर स्वतः साठी वेळ द्यावा यातून दिवस उर्जा मिळते. विविध खेळात नैपुण्य प्राप्त करता येते.म्हणून खेळास करीअर म्हणून पाहावे असे प्रतिपादन केले. 

मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद व खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

  याप्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी महेश खर्डेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे , जेष्ठ अधिकारी धोंडीराज खेडकर, क्रीडा अधिकारी शैलेंद्र सिंग गौतम, प्रा.संतोष कोळी , आदी उपस्थित होते

         जेष्ठ नागरिकांची क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली व त्यांना बक्षीस वितरण समारंभ केला.

टिप्पण्या