मुंबई - "कछुआ परिवार की पिकनिक" (प्रकाशक - प्रकाशन विभाग, भारत सरकार) यांचा लोकार्पण सोहळा ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि मराठी विश्वकोश निर्मितीच्या माजी अध्यक्ष डॉ. विजया वाड यांच्या हस्ते अंधेरी, मुंबई येथे पार पडला.
या प्रसंगी सिने- नाट्य, टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री- डॉ. निशिगंधा वाड आणि प्रसिद्ध अभिनेता पॅडी कांबळे उपस्थित होते. यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.
इतर पाहुण्यांमध्ये प्रसिद्ध शास्त्रीय गायक
डॉ. परमानंद यादव, सुप्रसिद्ध उद्योगपती व साहित्य-संस्कृती प्रेमी- डॉ. संजय कनोडिया, भारतीय सीमाशुल्क विभागातील निवृत्त अधीक्षक मोहन शिरकर, मोडी लिपी प्रशिक्षक अरविंद लेखराज, कुणाल आणि तनिष्का यांचा समावेश होता.
आसरा मुक्तांगनने यशस्वीरीत्या ११ वर्षे पूर्ण करून १२ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
डॉ. परमानंद यांनी सादर केलेल्या बंदिशाने या नेत्रदीपक कार्यक्रमाची सांगता झाली. डॉ.रमेश यादव यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. त्यांना त्यांच्या साहित्यिक कृतींसाठी अनेक सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आसरा फाउंडेशनसाठी ते आपले मौलिक योगदान देत असतात.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक व परिचय करण्यात आला. उपस्थित मान्यवरांना तुळशीचे रोपटे देवून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला.
हा कार्यक्रम म्हणजे हिंदी आणि मराठीचा साहित्य सेतू आहे असे गौरवोद्गार डॉ. विजया वाड यांनी काढले. या अनोख्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा