मुंबई दी.९: कामगार विरोधी मोदी सरकार हटावो!कामगारांचा गळा घोटणारे आणि मालकांची तळी उचलणारे बीजेपी सरकार चले जाव!चले जाव!अशा गगनभेदी घोषणा देत काल विविध कामगार संघटना एकत्र आलेल्या " कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती"ने मोदी सरकारच्या कामगार विरोधी नितीचा तीव्र शब्दांत निषेध केला.
९ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून काल महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांत निदर्शने छेडून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. मुंबईत गवालिया टॅंक मैदानावरील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून, ग्रॅटरोड रेल्वे स्टेशन समोर मोठे आंदोलन छेडण्यात आले.
कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र) च्या वतीने हे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. कालच्या निदर्शन आंदोलनात कृती समितीचे समन्वयक एम.ए.पाटील म्हणाले, कामगारांवरील अन्याय या पुढे खपवून घेतला जाणार नाही तर अध्यक्षीय कमिटीचे सदस्य आणि महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले,कामगार हित रक्षणासाठी केंद्र सरकार विरूद्ध कामगार संघटनांनी उचलले पाऊल आता कदापि मागे घेतले जाणार नाही.सिटुचे नेते विवेक मोन्टेरा,राज्य विमा योजनेचे संजय कुमार,निवृत्ती देसाई, महिला कामगार नेत्या बबली रावत,बजरंग चव्हाण,सुनिल बोरकर,मिलिंद तांबडे आदी कामगार नेत्यांची भाषणे झाली. आपल्या भाषणात त्यांनी कामगार विरोधी चार संहिता मागे घ्या,वापरा आणि फेकून द्या ही निती रद्द करा,खाजगीकरणाचे धोरण मागे घ्या, कंत्राटी पद्धती बंद करा,किमान वेतन लागू करा आदी मागण्या भाषणाद्वारे केल्या. लवकरच सरकार विरोधी राज्यस्तरीय महामोर्चा काढण्याचे शेवटी जाहीर करण्यात आले.
आंदोलनात इंटक,एआयटीयूसी,एच एम एस,एआयसीसीटीयु, एनटीयुआय,बीकेएसएम,टीयुसीआय,बीयुसीटीयु,एआयबीईए,बीईएफ
आय,एआयआयईए, राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, कामगार एकता मंच शिक्षक संघटना, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, स्वतंत्र फेडरेशन इत्यादी कामगार संघटना या लढ्यात सामील झाल्या आहेत....
addComments
टिप्पणी पोस्ट करा