गोदी कामगार संघटनेच्या शतकपुर्ती सोहळ्यानिमित्त कौटुंबिक स्नेहसंमेलन*


स्वातंत्र्यसैनिक, मुंबईचे माजी महापौर, माजी खासदार व ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शान्ति पटेल यांची जन्मशताब्दी, युनियनचा शतकपूर्ती सोहळा, हिंद मजदूर सभा अमृत महोत्सवी वर्ष, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मुंबई बंदराची १५० वर्ष या महत्त्वपूर्ण घटनांचे औचित्य साधून मंगळवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ०३.१५ वाजता दामोदर हॉल,परेल येथे गोदी कामगारांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन आयोजित केले आहे. तरी या सोहळ्याला कामगारांनी कुटुंबियांसह हजर राहावे, असे आव्हान ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी जाहीर कार्यक्रमात केले.

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने ३१ जुलै २०२३ रोजी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी ९२ वर्षे पूर्ण करून ९३ वर्षात पदार्पण केले, त्यानिमित्ताने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी माझगाव येथील कामगार सदन सभागृहात युनियनचे पदाधिकारी कार्यकर्ते व कामगार यांची सभा झाली. या सभेत ॲड.एस. के. शेट्ये यांना वाढदिवसानिमित्त युनियनच्या वतीने व सर्व खात्यातील कामगारांतर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी युनियनचे पदाधिकारी सुधाकर अपराज, lडॉ यतीन पटेल, विद्याधर राणे, दत्ता खेसे, विजय रणदिवे, विकास नलावडे, अहमद काझी, निसार युनूस, शीला भगत, मनीष पाटील, मारुती विश्वासराव, तसेच टांकसाळ मजदूर सभेचे मुकुंद वाजे, अलंग यूनियनचे विठोबा पवार, योगिनी दुराफे, श्रीकांत बिर्जे, आदी मान्यवरांची शुभेच्छापर भाषणे झाली. सत्कारमूर्ती ॲड. एस. के. शेट्ये यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आज कामगार चळवळी समोर अनेक आव्हाने आहेत, आपण सर्वांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे.

शतकपूर्ती निमित्त होणाऱ्या कौटुंबिक स्नेहसंमेलनासाठी हिंदू मजदुर सभेचे जनरल सेक्रेटरी हरभजनसिंग सिद्धू, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे चेअरमन राजीव जलोटा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी युनियनच्या कार्यावर आधारित " कर भला सो हो भला " ही लघुनाटीका सादर होणार आहे. तसेच या कार्यक्रमात युनियनच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा गुणगौरव केला जाणार आहे. तरी कामगारांनी आपल्या कुटुंबीयांसह वेळेवर हजर राहावे.

आपला

मारुती विश्वासराव

प्रसिध्दीप्रमुख

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या