वकिलांनी गेली कित्येक वर्षे आयपीसी सीआरपीसी आणि इंडियन एव्हडन्स ऍक्टची कलमं मुखोद्गत केली, आता त्यांचे अस्तित्वच संपलं आहे.
सॉफ्टवेअर इंजिनियर्सचे नॉलेज जेमतेम चाळीशी पर्यंत नवीन रहाते पुढे भलतीच कुठलीतरी टेक्नॉलॉजी येते आणि हे शून्य होऊन बसतात.
ऑपरेशन्स करणारे अतिशय तज्ञ सर्जन, नवीन बायोटेक्नॉलॉजी मधून कुठलीतरी ऑर्गन डेव्हलपमेंटची टेक्नॉलॉजी धंदा बंद करून जाते.
नवं नवीन टेक्नॉलॉजी बाजारात येण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे.
आज शिकलेले कौशल्य उद्या उपयोगात येईल याची कोणतीच खात्री देता येऊ शकत नाही.
टॅक्सेशनचे कायदे बदलले तर एवढे प्रचंड कष्ट करून सीए झालेल्या लोकांना काहीच काम उरणार नाही.
आजकाल माणसाने स्वतःची बुद्धी बहुपेडी विकसित करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.
व्यवसायात रुपांतरीत होऊ शकेल अशी एक दोन कौशल्ये स्वतःमध्ये विकसित करणे अनिवार्य झालेले आहे.
बँकिंग सेक्टरमध्ये माझ्या देखत चेक पास होण्याच्या कंटाळवाण्या प्रकारापासून ते यूपीआयच्या इन्स्टंट पेमेंट पर्यंत आमूलाग्र बदल घडलेला आहे.
आयसी इंजिन, कारब्युरेटर, एक्सझोस्ट, गियर्स अशा किचकट रचनेतून ऑटोमोबाईल इंडस्ट्री झटक्यात बाहेर पडली आणि बॅटऱ्यांवर चालू लागली आहे. जुन्या मेकॅनिकच्या धंद्याचे वाटोळंच करून गेली.
कन्स्ट्रक्शन मध्ये प्री कास्ट, प्री टेन्शन येऊ लागल्यानंतर जुने ठेकेदार जॉबलेस झाले आहेत.
एकाच प्रॉडक्टच्या ट्रेडिंगच्या आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या मागे लागायचे आणि त्या प्रॉडक्टची मार्केटमधून अचानक गरजच संपून जाते, असे प्रकार तर खूपच घडताना दिसून येतात.
एखाद्या मटेरियलवर सरकारी बॅन येतो आणि असंख्य कारखाने बंद पडायच्या मार्गाला लागतात, हे प्लास्टिक इंडस्ट्रीने चांगलेच अनुभवलेले आहे.
वॉटर प्रूफिंगच्या बाबतीत तर केमिकल्स आल्यामुळे जुने ब्रिक बॅट कोबा करणारे कंत्राटदार आणि गवंडी अक्षरशः शून्य झाले.
आता माणसाला एकच एका कौशल्यावर अवलंबून राहून चालण्याचे दिवस संपले आहेत.
अगदी सुरक्षित अशी समजली जाणारी बँकेतली सर्व्हिस सुद्धा युपीआय आल्यानंतर सुरक्षित राहिलेली नाही.
आपणच जगाची एखादी गरज ओळखून ती आपल्याला पूर्ण करता येईल असा व्यवसाय शोधणे आवश्यक झाले आहे.
त्यामध्येही आपले वैशिष्ठ्य कायम राखून आपले कॉम्पिटिटर्स आपल्या जवळही फिरकू न देणे हा सुद्धा एक कौशल्याचाच भाग आहे.
आपले उत्पन्न जपून वापरणे, आपले राहणीमान कमीतकमी खर्चिक ठेवणे, आपले पैसे फक्त उत्पन्नासाठीच खर्च करणे, हे आर्थिक नियमन कसोशीने पाळणे आजकालच्या दिवसात अनिवार्य झालेले आहे.
आज दोन पैसे हातात आले तर त्याचा विनियोग अनुत्पादित खर्चासाठी न करता ते साठवून ठेवणे आणि उत्पादन खर्चाची संधी आली की त्याचा विनियोग करणे आता आवश्यक बनलेले आहे.
व्यवसायात आलेल्या उत्पन्नात, डेप्रिसिएशन, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट्स आणि सिंकिंग फंड्सचा समावेश असतो, तो बाजूला काढून ठेऊन प्रॉफिट घेण्याची सवय स्वतःला लावून घेणे गरजेचे आहे.
बांधकाम व्यावसायिकांच्या हातात एकदम ग्रॉस उत्पन्न मिळते, त्यातले सात ते आठ टक्के उत्पन्नच फक्त आपले आहे, हे बांधकाम व्यावसायिकाने कायम लक्षात ठेवणे गरजेचे असते.
अनेक बांधकाम व्यावसायिक भपका हि मार्केटिंगची गरज समजतात आणि अतिशय महागड्या गाड्या, भपकेदार ऑफिसेस आणि प्रचंड पगार देऊन भरपूर स्टाफ गोळा करून ठेवतात, एक दिवस उंटाच्या पाठीवर शेवटची काडी ठेवली जाते आणि सगळा उंट कोसळून पडतो.
फायनान्शियल मॅनेजमेंट आणि मॉब सायकॉलॉजी भाषेचे ज्ञान एखादी कला आणि त्याच्या जोडीला इंजिनियरिंग मेडिसिन किंवा तत्सम गोष्टींचे ज्ञान असेल तरच आजकाल माणूस सर्वाईव्ह होऊ शकतो.
*विचार करायला लावणारा लेख
सौजन्य इंटरनेटवरील ब्लॉग
संकलन धनराज भारती
9403064242
▪️dhanrajbharati1@gmail.com
addComments
टिप्पणी पोस्ट करा