रामिम संघ आयोजित कामगारांच्या 'गुडघे-सांधे दुखी' शिबिरा ला कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


       मुंबई दि.१६:राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या विद्यमाने आणि प्रख्यात सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या 

अस्थिव्यंग तपासणी शिबीराला गिरणी कामगारांचा मोठाच प्रतिसाद लाभला. संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने,कामगारांच्या खास आग्रहास्तव हे अस्थिव्यंगावरील शिबिर मजदूर मंझीलच्या मनोहर फाळके सभागृहात पार पडले.शिबिरासाठी १५ ऑगस्ट प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधण्यात आले.डॉ.हर्षद जाधव,डॉ.किरण लडकत, डॉ.अनिमेश कुमार, डॉ.अभिजीत सावदेकर या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गद र्शना खाली ५० वर्षेवयावरील कामगार रूग्णांची निःशुल्क तपासणी करण्यात आली.सरसिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले,संघटनेची आरोग्य विषयक सामाजिक जबाबदारी ओळखून आम्ही हे‌ शिबीर आयोजित केले.डॉक्टर जाधव म्हणाले,या निमित्ताने कष्टकरी कामगारांची‌ सेवा करायला संधी मिळाली हे‌ आम्ही आमचे भाग्य समजतो.या प्रसंगी रुग्ण कामगारांची तपासणी करण्यात आली आणि मोफत औषधै देण्यात आली.काहींना व्यायामाचे प्रकार आणि खाण्याची पथ्य पाळण्याच्या सूचना देण्यातआल्या

    शिबिरासाठी आलेल्या डॉक्टरांचे स्वागत खजिनदार निवृत्ती देसाई व उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी केले.

.-काशिनाथ माटल

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
मुंबई शहराचा कणा असलेला कामगार मुंबईतून हद्दपार झाला _* अशोक नायगावकर
इमेज