*बंधुत्व फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त सभासदांना बॅग वाटप.*



गोदी विभागातील बंधुत्व फाऊंडेशन या सामाजिक सेवा संस्थेला २० वर्षे पूर्ण झाली म्हणून, वर्धापन दिनानिमित्त दादर येथील भाई कोतवाल उद्यानात १६ ऑगस्ट २०२३ रोजी बंधुत्व फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समीर राणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व सभासदांचे एकत्रिकरण करुन आपल्या सभासदांना भेटवस्तू म्हणून बॅगचे वाटप केले. 

याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्टचे सेवानिवृत्त सहाय्यक गोदी प्रबंधक प्रकाश दाते, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धीप्रमुख व पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, फिलॅथ्रोपिक फाऊंडेशनचे सेवानिवृत्त अध्यक्ष व लेखक प्रदीप गोलतकर, ज्येष्ठ साहित्यिक, कवी शांताराम लोखंडे, कवी व लेखक अशोक विचारे, लेखक हेमंत वरळीकर, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे राजेश राठोड, ए .के. टुर मॅनेजर अरविंद जागडे, विजय काटकर, एस. डी. महापदी व इतर सभासद कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होते.

याप्रसंगी बंधुत्व फाऊंडेशनच्या उपस्थित सर्व सेवानिवृत्त सभासदांनी बंधुत्व फाऊंडेशने आयोजित केलेले सेवा निवृत्ती निमित्त निरोप समारंभाच्या कार्यक्रमा विषयी कौतुक करुन , अवयवदान, नेत्रदान, रक्तदान इत्यादी सामाजिक कार्याविषयी आपली मनोगते व्यक्त केली.

मारुती विश्वासराव यांनी फाऊंडेशनच्या प्रत्येक सभासदांची माहिती जमा करुन त्यांच्या गुण वैशिष्ठांसहीत त्या सभासदावर लेख तयार करुन त्याची स्मरणिका प्रकाशित करावी असे सुचविले. प्रथम हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमा निमित्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सर्वांना भेटण्याची संधी मिळाली, अशी सर्वांनी आपली भावना व्यक्त केली. शेवटी चहापाण करुन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली.

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या