नायगाव :- धानोरा (त.मा.) येथे स्वतंत्रदिनानिमित्त कृषी महाविद्यालय नायगांव (बा.) यांच्या वतीने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपनमध्ये वड, पिंपळ, अशोक, गुलमोहर, लिंब अश्या वेगवेगळ्या प्रकारची झाडे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात ग्रामपंचायत आणि मंदिर परिसरात लावण्यात आले.
स्वतंत्रदिनानिमित्त उपस्थित विद्यार्थांना खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी सरपंच सौ.गंगुताई संजय पा.कंदुरके, उपसरपंच सौ.चंद्रकलाबाई व्यंकटराव गजले, चेअरमन यशवंतराव पा. कुऱ्हाडे, परमेश्वर गुरुजी (माजी सरपंच), आनंदराव गुरुजी धानोरकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या वतीने प्रा.एस.जी. नागणीकर ( RAWE Incharge), डॉ. पी.जी.तोटेवाड (Programme Officer), डॉ.एस.ए.शेंडगे, प्रा.एस. एम.तळणे, प्रा.एन.पी.पोमदे व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
.jpg)
addComments
टिप्पणी पोस्ट करा