*नवी मुंबईत सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ७७ बा स्वातंत्र्य दिन साजरा*


नवी मुंबईत ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने स्व. सीताराम मास्तर उद्यानात भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. झेंडावंदन संघाचे अध्यक्ष मारुती कदम यांच्या हस्ते झाले, तर भारत मातेचे प्रतिमापूजन सेवानिवृत्त सैनिकांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भारतीय स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे क्रांतिवीर, भारताची महासत्तेकडे वाटचाल, कोरोना काळात भारताची उत्कृष्ट कामगिरी इत्यादी महत्त्वाच्या विषयावर सानपाडा येथील समाजसेवक आबा जगताप, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव खैरनार, खजिनदार विष्णुदास मुखेकर, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, कार्यकर्ते भरत खरात आदी मान्यवरांनी भाषणे करून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी बळवंतराव 

पाटील, सुभाष बारवाल, डॉ. विजया गोसावी, गणेश कमळे, रमेश शेट्ये, मारुती शिंदे, महादेव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सिताराम मास्तर उद्यानातील हास्य क्लब योगा सदस्य, गार्डन ग्रुप सदस्य व सानपाड्यातील रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सभेचे सूत्रसंचालन संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे यांनी केले.

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या