नवी मुंबई सानपाडा येथे रक्तदान शिबिर*


नवीन मुंबई सानपाडा येथील लोकप्रिय समाजसेवक व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्याराव यांच्या ११ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त केमिस्ट भवन येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. त्याचबरोबर बुद्ध विहारमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक्वागार्ड देण्यात आले. असे अनेक समाजउपयोगी विविध उपक्रम त्यादिवशी संपन्न झाले. सानपाडा येथील सर्वांना उपयोगी पडणारे समाजसेवक, कोणताही जाती धर्म पक्ष न पाहता सर्वांना मदत करणारे, सर्वांच्या सुखदुःखाला उपयोगी पडणारे मिलिंद सूर्याराव यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यामधील महत्त्वाचा म्हणजे दरवर्षी ते आपल्या सुयोग मित्र मंडळाच्या सहकार्याने व शिवसेना परिवारातर्फे वृक्षारोपण करून ती झाडे कशी जगतील त्यासाठी पाणी घालून त्या झाडाचे संगोपन करतात. एवढेच नव्हे तर सानपाडा येथील विद्यार्थ्यांना किल्ले दाखवण्याचे काम करतात. याशिवाय शाळेमध्ये ज्या गरीब विद्यार्थ्यांना शिवसेनेतर्फे शैक्षणिक फी देण्याचेही महान कार्य करतात. याप्रसंगी नवीन मुंबईचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, नगरसेवक व उपशहर प्रमुख सोमनाथ वास्कर, शाखाप्रमुख अजय पवार, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, सामाजिक कार्यकर्ते रणवीर पाटील, तेजाभाई वाडेकर, दत्तात्रय कुरळे, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते, सानपाडा येथील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या