*राज्य नामांकन टेबल टेनिस स्पर्धेत परभणी ची आद्या बाहेतीस उपविजेेपद*


  परभणी (. ‌. ) दि. १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस संघटनेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली .त्यात आद्या महेश बाहेती हिने आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत अंतिम फेरीत खेळत उपविजेेपद पटकावले. उप-उपांत्य पूर्व सामन्यात नाशिक केईशा पुरकर वर ३-२ असा विजय मिळवत उप-उपांत्य फेरी गाठली. उपांत्य पूर्व सामन्यात नागपूरच्या पूर्वी रेणू वर ३-१ असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. चुरशीच्या झालेल्या उपांत्य सामन्यात मुंबई उपनगरच्या व्दितीय मनाकित वेदिका जैस्वाल वर ३-२ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरी खेळत तीने उपविजेतेपद पटकावले.

तसेच ओवी महेश बाहेती हिने उप उपांत्य पूर्व फेरी खेळली तर सहभागी खेळाडू मध्ये शरयू माधव टेकाळे या स्कॉटिश अकॅडमी या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. समृध्दी नांदापुरकर, देवाशिष राजेश कदम, शिवनंदन मनोहर पुरी, रुद्र माधव पाटील, योगेश राम घुले हे बळविद्या मंदिर शाळेचे विद्यार्थी आहेत आरूष गुलाब ताठे, शिवम अनिल डख हे नूतन विद्याला सेलू या शाळेचे विद्यार्थी आहेत तर अद्वैत श्रीकांत मणियार पोदार इंटरनॅशनल शाळेचा विद्यार्थी आहे .

वरील सर्व खेळाडू जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी, क्रीडा व युवक सेवा संचलनालय म.रा.पुणे व भारतीय खेळ प्राधिकरण (साई) यांच्यामार्फत चालणाऱ्या खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र परभणी येथे प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतात.तसेच या खेळाडूंना विजय अवचार, अजिंक्य घन, तुषार जाधव,सुरज भुजबळ, रोहित जोशी, विशाल मेहता, शिवप्रसाद कदम,गौस खान पठाण, चेतन सुरवसे, विक्रम हत्तेकर, निखील झुटे यांनी स्पर्धा सरावासाठी मार्गदर्शन केले.


या उज्वल बद्दल जिल्हा क्रीडाधिकारी जयकुमार टेंभरे,परभणी सिटी क्लब सचिव डॉ.विवेक नावंदर , राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, क्रीडाधिकारी शैलेंद्रसिंग गौतम, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष समशेर भैय्या वरपुडकर, कार्याध्यक्ष डॉ.माधव शेजुळ , जिल्हा उपाध्यक्ष संतोष सावंत, जिल्हा सचिव गणेश माळवे, डी.पी.पंडीत, खेळाडू, पालक यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या