जबरी चोरी प्रकरणात तीन तासांतच आरोपी अटक, बाळापुर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

प्रतिनिधी - महेंद्र पुरी हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ते वारंगा मार्गावर दुचाकी स्वारास अडऊन चाकुचा धाक दाखवून विस हजारांचा ऐवज लुटल्याची घटना रात्री साडे दहा च्या सुमारास घडली होती. घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार यांनी तातडीने सुत्रे हलवीत धडाकेबाज कामगिरी बजावली व आवघ्या तीन तासातच चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील भोसी येथील राजेश अवचार हे गुरूवारी १० आगस्ट रोजी कामानिमित्ताने बाळापुर येथे आले होते. रात्री साडेदहा च्या सुमारास ते आपल्या मित्रासह दुचाकी वाहनावर भोसीकडे निघाले होते. यावेळी दाती फाटा येथे दोन दुचाकीवरून आलेल्या सहाजणांनी अवचार यांची दूचाकी अडऊन त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्या जवळील पैशे काढुन घेत. त्यांच्या जवळील दहा हजार व मोबाईल असा २० हजारांचा ऐवज पळवीला. त्यानंतर सदर सहा आरोपींनी दुचाकीवरून पळ काढला. या प्रकरणी काही नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षात संपर्क साधला. पोलिस नियंत्रण कक्षातुन घटनेची माहिती बाळापूर पोलीसांना मिळताच. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार यांनी तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. व आरोपींनी फिर्यादीचा चोरून नेलेल्या मोबाईल चे लोकेशन सायबरसेल च्या मदतीने ट्रेस करून आरोपीचा पाठलाग करून नांदेड मार्गावर डोंगरकडा परिसरात चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर यामधील दोन आरोपींनी अंधाराचा फायदा घेऊन पलायण केले आहे. फरार दोन आरोपींच्या शोधासाठी बाळापुर पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. जिल्ह्यात चोरी लुटमार च्या घटना घडत असुन आखाडा बाळापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे.

टिप्पण्या