सानपाडा येथील आनंद मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप*



नवी मुंबईत सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिक संघात दर महिन्याला शेवटच्या दिवशी वाढदिवस साजरे केले जातात. ३१ जुलै २०२३ रोजी झालेल्या आनंद मेळाव्यात ज्येष्ठ नागरिक सभासदांनी उपस्थित राहुन चांगले सहकार्य केले, या आनंद मेळाव्यास विशेष पाहुणे म्हणून सानपाडा येथील माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर व कोमल वास्कर यांनी वाढदिवसानिमित्त ‌३१० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तसेच संघास आर्थीक सहकार्य करून ज्येष्ठाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. वयाची ६० ते ८८ वर्षे पूर्ण झालेल्या ८२ सभासदांचे वाढदिवसाचे कार्यक्रम आनंद मेळाव्यात साजरे झाले. या सुंदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे कार्यकारी अध्यक्ष विठ्ठल गव्हाणे यांनी केले तर आभार पदाधिकारी बळवंतराव पाटील यांनी मानले. सचिव राजाराम खैरनार, खजिनदार ‌विष्णुदास मुखेकर, पदाधिकारी शरद पाटील, सुभाष बारवाल, उपाध्यक्ष डॉ. विजया गोसावी इत्यादी कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरुंगळा केंद्रामार्फत ज्येष्ठाच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न सतत चालू असतात. या‌ कामात सर्व कार्यकारी मंडळाचे सहकार्य असते. त्यांच्या या कार्यामुळेच नवी मुंबईत सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघ, ज्येष्ठांचे उपक्रम राबविणारी आज एक नंबरची संस्था आहे. ‌यापुढे‌ संघात विविध‌‌ ऊपयुक्त कार्यक्रम राबवण्याचा संकल्प कमिटीने केला आहे. ज्येष्ठाचे जीवन यशस्वी, सुखमय‌ व निरोगी होण्यासाठी कार्यकारणीचे सतत प्रयत्न चालू असतात. सदर आनंद मेळाव्यास संघाचे संस्थापक भगवान शेजाळे, माजी पदाधिकारी राम काजोलकर, चंद्रकांत पारपिल्लेवार, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, महाराष्ट्र शासनाचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी देवेंद्र भुजबळ, नवी मुंबई टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार सी . सुब्रमण्यम आदी मान्यवर उपस्थित होते.

आपला

 मारुती विश्वासराव

टिप्पण्या