विद्यापीठाचा पंचवार्षिक प्लॅन विद्यार्थी केंद्रित रहावा उच्च शिक्षणा पासून विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी प्रयत्न - सिनेट सदस्य दिपक मोरताळे

 


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पंचवार्षिक आराखडा सिनेट च्या अंतिम मान्यते साठी दि 24 जुलै रोजी सिनेट बैठकीत सादर केला.त्याचे अभ्यासपूर्ण अवलोकन केल्यास मराठवाडा मागास का राहतो हे लक्ष्यात येईल.

विद्यापीठाचा ग्रॉस एंरोलमेंट रेशु हा फक्त 11 आहे, म्हणजे 18 ते 23 वयोगटातील उच्च शिक्षण प्रवेश करू इच्छिणाऱ्या 100 विद्यार्थ्यांपैकी 11 च विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची क्षमता विद्यापीठ व सर्व सलग्न 372 महाविद्यालयांची आहे. संपूर्ण देशाचा विचार केला तर देशाचा ऍव्हरेज ग्रॉस एंरोलमेंट रेशु 25 पेक्षा जास्त आहे.विद्यापीठाने पुढील पाच वर्षात ध्येय 25 चा ठेवला असून,ग्रॉस एंरोलमेंट रेशु 25 प्राप्त करायचा असल्यास किमान नवीन 400 नवीन महाविद्यालय सुरु करावे लागतील.विद्यापीठाने शिक्षणातील अनुशेष दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.

नांदेड लातूर परभणी हिंगोली या चार जिल्ह्यात या वर्षी 103311 विद्यार्थी 12 वी पास झाले असून त्यातील फक्त 31666 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची क्षमता विद्यापीठ व सर्व सलग्न 372 महाविद्यालयांची आहे. विज्ञान शाखेत या वर्षी 51741 विद्यार्थी या चार जिल्ह्यात 12 वी उत्तीर्ण झालेत त्यापैकी 11096 विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकतील, तसेच कला शाखेत 33080 विद्यार्थी या चार जिल्ह्यात 12 वी उत्तीर्ण झालेत त्यापैकी 12859 विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकतील, वाणिज्य शाखेत 9317 विद्यार्थी या चार जिल्ह्यात 12 वी उत्तीर्ण झालेत त्यापैकी 7711विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकतील. हे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे.

नवीन शैक्षणिक धोरण NEP अंतर्गत सामाजिक प्रकल्पमध्ये सर्व वर्गांच्या 127000 विद्यार्थ्यांना विविध सामाजिक प्रकल्पा मध्ये भाग घेणं बंधनकारक असताना पंच वार्षिक प्लॅन मध्ये फक्त 15000 विद्यार्थ्यांसाठी प्लॅन तयार करण्यात आला त्यामध्ये सुधारणा करावी अशी आग्रही भूमिका घेण्यात आली 

तसेच संशोधन क्षेत्रात फक्त 1500 विद्यार्थ्यांसाठी प्लॅन तयार करण्यात आला आहे.पंच वार्षिक योजनेत फक्त 20 पेटन्ट साठीच प्लॅन तयार करण्यात आला आहे.सध्या फक्त 17 उद्योग घटकांना विद्यापीठ सेवा पुरवते पंच वार्षिक प्लॅन मध्ये फक्त 25 उद्योग घटकांना सेवा देण्याचा प्लॅन आहे.त्यातही वाढ अपेक्षित आहे.

विद्यापीठ कायद्याप्रमाणे पंच वार्षिक प्लॅन तयार करताना सिस्टमाटीक फिल्ड सर्व्हे करावा अशी मागणी लावून धरण्यात आली.

विद्यापीठाने मागील पाच वर्ष पर्यावरण क्षेत्रात लोकसहभागतून केलेल्या कामामुळे विद्यापीठाला आंतर राष्ट्रीय हरित विद्यापीठ पुरस्कार घोषित झाल्या बद्दल कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांचा सत्कार सर्व सिनेट सदस्यां मार्फत दिपक मोरताळे व प्रदीप नणंदकर यांनी केला ,पर्यावरण कार्यकर्ते च्या आग्रह मुळे पंच वार्षिक योजनेत प्रत्येक महाविद्यालयास 9 गावे दत्तक घेण्यासाठी प्रवृत्त केले जाईल याचा समावेश केल्याबद्दल ही कुलगुरू चे अभिनंदन करण्यात आले .

मराठवाड्यावर होत असलेला अन्याय दूर व्हावा यासाठी या बैठकीत अभ्यासपूर्ण आग्रही भूमिका सिनेट सदस्य दिपक मोरताळे यांनी घेतली .

टिप्पण्या