राष्ट्रीय मिल मजदूर संघ ग्रंथालयाद्वारे ग्रंथालय चळवळीचे जनक पण्णिक्कर यांच्या स्मृतींना देण्यात आला उजाळा!


   

     मुंबई दि.१७:राष्ट्रीय मिल मजदूर संघ सार्वजनिक ग्रंथालय आणि वाचनालयाच्या वतीने ग्रंथालयाचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने आज ग्रंथालय साक्षर चळवळीचे प्रणेते पी.एन.पणिक्कर यांच्या स्मृती प्रित्यर्थ वाचक दिन आणि वृक्षारोपण दिन समारंभ संपन्न झाला. 

    ग्रंथालयाचे एक जुनेजाणते वाचक विविध विषयांचा अभ्यास असलेले निवृत्त अधिकारी प्रणय सुर्वे यांच्या हस्ते ग्रंथालय चळवळीचे प्रणेते स्व.पी.एन.पणिक्कर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांचे पुण्य स्मारण करण्यात आले.तर खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष 


अण्णा शिर्सेकर, सुनिल बोरकर यांच्या हस्ते संघटनेच्या प्रांगणात वृक्षारोपण समारंभ पार पडला. 

    परेलच्या मजदूर मजदूर मंदिर मधील ग्रंथालयात आयोजित करण्यात आलेल्या वाचकदिन समारंभात बोलताना,ज्येष्ठ वाचक प्रणय सुर्वे म्हणाले,राष्ट्रीय मिल मजदूर संघा सारखे समृद्ध ग्रंथालय गिरण गावात क्वचित दिसेल.मात्र या ग्रंथालयाचा वाचकांनी उपयोग करून घेतला पाहिजे.केरळ राज्यातील ग्रंथालय चळवळीचे जनक पी.एन. पण्णिक्कर यांच्या कार्याची माहिती देऊन प्रणय सुर्वे म्हणाले, डिजिटल वाचनाची आवड आता वाढायास हवी.ती काळाची गरज आहे.

    उपाध्यक्ष बजरंग चव्हाण,लेखक प्रसिध्दी प्रमुख काशिनाथ माटल यांनी सांगितले,ख-या अर्थाने माणूस घडायचा असेल तर वाचनाची गोडी वाढावयास हवी.

    प्रारंभी प्रभारी ग्रंथपाल ममता घाडी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात जी.डी.आंबेकर प्रतिष्ठान कॉलेजच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी भाग घेतला.वाचनालयाचे संचालक मारुती शिंत्रे यांनी आभार मानले.संघटनेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाल मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

*******

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
मुंबई शहराचा कणा असलेला कामगार मुंबईतून हद्दपार झाला _* अशोक नायगावकर
इमेज