उत्तर प्रदेशातील नाविक कामगारांसाठी नुसिने वाराणसी येथे २२ व्या शाखा कार्यालयाचे भव्य ऊदघाटन ८ जुलै २०२३ रोजी नॅशनल युनियन ऑफ सीफेअरर्स ऑफ इंडिया जनरल सेक्रेटरी व खजिनदार श्री मिलिंद कांदळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
नुसी वाराणसी शाखेचे कार्यालय S-5/149, A-2. KH-2, Aktha बेला रोड, J. D. नगर कॉलनी फेज - 2, पहारिया, जानकी वाटिका समोर, वाराणसी, उत्तर प्रदेश - 221 007. येथे असून या शाखेचे
प्रतिनिधी श्री. महेंद्र नाथ असून त्यांचा मोबाईल क्रमांक: +91 88799 64113 असा आहे. तसेच या कार्यक्रमाला इंडियन कोस्टल कॉन्फरन्स शिपिंग असोसिएशन (ICCSA) चे सचिव कॅप्टन राकेश सिंग, श्री जनार्दन बहिरत, एलिगंट मरीन सर्व्हिसेस प्रा. लि., कॅप्टन करण मदन, अँग्लो इस्टर्न शिप मॅनेजमेंट प्रा. लि., संघटक सचिव श्री सुरेश सोलंकी आणि न्यूसीचे 1500 हून अधिक नाविक कामगार ऊपस्थित होते.
नुसीचे जनरल सेक्रेटरी व खजिनदार श्री. मिलिंद कांदळगावकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, देशभरातील आमच्या नाविक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या काळजी घेण्यासाठी नुसी वचनबद्ध आहे. अधिकाधिक नुसी सदस्यांना त्यांच्या भारतीय आणि परदेशी ध्वज करार आणि कल्याणकारी उपक्रमांचे लाभ मिळावेत यासाठी नुसी आपल्या शाखांचा विस्तार करत आहे.
फ्लीट मॅनेजमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे आयोजित रोजगार आणि भरती मोहीम राबवली. नाविकांना करिअरच्या संभाव्य संधी शोधण्याची आणि उद्योग व्यावसायिकांशी संवाद साधण्याची उत्तम संधी या कार्यक्रमात प्राप्त झाली. या कार्यक्रमाला नाविक आणि त्यांच्या कुटुंबियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या जनसमुदायाने नाविकांच्या अधिकारांचे आणि भवितव्याचे रक्षण करण्यासाठी नुसीचे कौतुक केले.
कांदळगावकर यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले की, नुसीने 22 व्या शाखा कार्यालयाचे उद्घाटन करून उत्तर भारतातील नाविकांना दिलेले वचन पूर्ण केले आहे. नुसी नाविकांच्या रोजगारासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी कठोर परिश्रम करत राहील.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा