प्रतिनिधी - महेंद्र पुरी हिंगोली
गाव खेड्यामधील गोपनीय माहिती प्रशासनाला कळविण्यात संदर्भाने पोलीस पाटील हे महत्त्वाचे पद मानले जाते, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस पाटील यांची गोपनीय माहिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते, त्या अनुषंगाने महसूल प्रशासनाने प्रत्येक गाव खेड्यामध्ये पोलीस पाटील हे पद निर्माण करून त्यांना मानधन देण्यात येते.
दिनांक. 7 जून 2023 रोजी रोजी वसमत तालुक्यातील मौजे आडगाव रंजे या गावी महापुरुषाचा पुतळा अनधिकृत रित्या बसवला आहे, त्या अनुषंगाने आडगाव रंजे येथील पोलीस पाटील विलास माणिकराव चव्हाण यांनी सदरची माहिती प्रशासनाला कळविणे अत्यंत गरजेचे होते तरीसुद्धा आडगाव रंजे येथील पोलीस पाटील चव्हाण यांनी सदरची माहिती प्रशासनाला कळविली नाही, त्यावरून पोलीस स्टेशन हाट्टाचे ठाणेदार सपोनी गजानन बोराटे यांनी पोलीस पाटील यांना सदरची माहिती न देण्याबाबत विचारणा केली असता कोणतेही समाधानकारक उत्तर पोलीस पाटील चव्हाण यांच्याकडून मिळाले नाही, त्यावरून सपोनि गजानन बोराटे यांनी सदर पोलीस पाटील यांचा कसुरी रिपोर्ट वसमत चे उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ यांच्याकडे पाठविला होता. त्यावरून वसमत चे उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ यांनी आडगाव रंजे येथील पोलीस पाटील यांना सदर अनाधिकृत पुतळा संदर्भाने प्रशासनाला माहिती न देण्याचे कारण विचारले असता कोणतेही समाधानकारक कारण पुढे न आल्याने वसमतचे उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ यांनी आडगाव रंजे येथील पोलीस पाटील चव्हाण यांना तीन महिन्यासाठी निलंबित केले आहे.
प्रशासनाद्वारे सर्व पोलीस पाटील यांना सूचना करण्यात येते की आपल्या गाव खेड्यांमधील कायदा व सुव्यवस्था निर्माण करणारी व सार्वजनिक शांततेस बाधक ठरणारी कोणतीही प्रशासनिक दृष्ट्या महत्त्वाची माहिती तात्काळ प्रशासनास द्यावी.
addComments
टिप्पणी पोस्ट करा