हिंगोली ः राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बुथ कमिटीचे प्रमुख बी.डी बांगर हे अजित पवार यांच्या पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असून त्यांच्या खांद्यावर अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बी.डी. बांगर यांच्या रूपाने मुळ राष्ट्रवादीला पहिला झटका बसण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडामुळे उभी फुट पडल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मात्र शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या बंडाचा जिल्ह्यावर परिणाम झाला नाही. परंतु आता हळुहळू अजित पवार यांना पाठींबा देणारांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हा सरचिटणीस बी.डी. बांगर हे अजित पवार यांच्या गटात सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांचे समर्थक म्हणून बांगर यांची ओळख आहे. आता अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडेही सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्या बंडाचा जिल्ह्यात परिणाम झाला नसला तरी बी.डी. बांगर हे अजित पवार गटात सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे ते आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात सहभागी होतील. त्यानंतर त्यांच्या खांद्यावर अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल अशी शक्यता राजकीय गोटातून व्यक्त होऊ लागली आहे. बी.डी. बांगर यांच्या रूपाने अजित पवार गटाला हिंगोली जिल्ह्यात पाय रोवण्याची संधी मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस बी.डी. बांगर हे गैरहजर होते. तसेच मुंबई येथे पार पडलेल्या दोन्ही गटाच्या बैठकीदरम्यान ते मुंबईत उपस्थित असल्याचे समोर आले आहे. बांगर यांनी अजित पवार यांच्यासह धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा