मुंबई २५: गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर येत्या दोन दिवसांत कृती समितीच्या नेत्यां बरोबर चर्चा करून तोडगा काढण्यात येईल,असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्याला दिले आहे,अशी माहिती राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ आहिर यांनी आज आझाद मैदाना वरील गिरणी कामगारांच्या आक्रोश मोर्चा समोर बोलताना दिली आहे.
गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने फॉर्म भरलेल्या सर्व कामगारांना घरे मिळालीच पाहिजे,या मागणीसाठी आज विधानभवनवर कामगारांचा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी सचिनभाऊ अहिर कामगारांपुढे बोलत होते.
या प्रसंगी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पोटोळे,आमदार भास्करराव जाधव, आमदार राजन साळवी,आमदार सुनिल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार सचिनभाऊ अहिर म्हणाले, मुंबईतील सुमारे ३० हजारावर घरे फक्त बांधकामाचा खर्च पकडून गिरणी कामगारांना आम्ही मिळवून दिली आहेत.मु़बईतील एन.टी.सी.गिरण्यांची जागा गिरणी कामगारांना देण्याचा राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा,असा प्रयत्न आपण करणार आहोत,असे आमदार सचिनभाऊ अहिर म्हणाले.
गिरणी कामगार घरांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी शासनाने नेमलेल्या संनियंत्रण समितीत कामगार नेते आणि विरोधी पक्षनेत्यांना डावलून जे पक्षीय राजकारण खेळले गेले आहे, त्याचा आपल्या भाषणात सचिनभाऊ अहिर यांनी तिव्र शब्दांत निषेध केला आहे.तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना घरांच्या प्रश्नावर एक निवेदन देण्यात आले.त्या वेळी सचिन अहिर यांच्या समवेत कृती समितीचे नेते निवृत्ती देसाई, शिवाजी काळे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दाणवे म्हणाले,ज्या गिरगि कामगारांनी आपल्या घामावर गिरणी उद्योग उभा केला त्या ला घरे मिळालीच पाहिजे.कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोळे म्हणाले सरकार गिरणी कामगारांना घरां साठी जमीन देत आहे ही मेहरबानी नसून तो त्यांचा अधिकार आहे.तो प्रश्न आम्ही आम्ही विधिमंडळात लावून धरु.आमदार भास्करराव जाधव, आमदार सुनील शिंदे, आमदार राजन साळवी यांची आंदोलनाला पाठिंबा देणारी भाषणे झाली.
गिरणी कामगार कृती संघटनेच्या समन्वयक पत्रकार जायश्री खाडिलकर पांडे यांनी संनियंत्रण समिती किंवा काही कामगार संघटना कडून जी कामगारांची फसवणूक सुरु आहे,तिचा समाचार घेतला.कृती समितीचे नेते गोविंदराव मोहिते यांनी आपल्या भाषणात घरे मिळविण्यासाठी जो विलंब होत आहे त्या वर भाष्य करून, कामगार हा लढा शेवटपर्यंत शर्थीने लढतील ,असे सांगितले.सर्वश्री निवृत्ती देसाई, नंदू पारकर, अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, जयवंत गावडे, जितेंद्र राणे, सुनिल बोरकर,सुरेश मोरे,रविंद्र कानडे, सुनंदा भागवत,साई निकम ,
अर्चना दिवाळे आदींची भाषणे झाली.
ठाणे,कल्याण, अंबरनाथ येथील,प्रस्तावित सरकारी ११० एकर जमिनीवर घरे बांधा! एनटीसी गिरण्यांची जमीन गिरणी कामगारांना घरां साठी द्या! गिरण्यांच्या जागेवरील संक्रमण शिबिरातील घरे गिरणी कामगारांना द्या! संक्रमण शिबिरातील घुसखोरी तील घरे गिरणी कामगारांना द्या,एम.एम.आर. डि.ए.आणि शिडकोच्या एकूण घरांपैकी ५०% घरे गिरणी कामगारांना द्या,मागील सरकारने कामगाराना देऊ केलेली विरार येथील साठ-सत्तर हजार घरे गिरणी कामगारांना द्या,आशा मागण्या आंदोलन प्रसंगी करण्यात आल्या.
*****
addComments
टिप्पणी पोस्ट करा