नवी मुंबईतील भारतीय जनता पार्टी, सानपाडा यांच्यावतीने विभागातील दहावी व बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नवी मुंबईचे माजी महापौर श्री. सागर नाईक यांच्या शुभहस्ते भेटवस्तू देऊन सानपाडा सेक्टर ८ मधील देशस्थ मराठा भवन येथे संपन्न झाला.
भारतीय जनता पार्टीचे सानपाडा येथील समाजसेवक भाऊ भापकर,सुनील कुरकुटे, राजेश ठाकूर, समाजसेविका शिल्पा ठाकूर, शैलजा पाटील यांनी दहावी व बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा १६ जुलै २०२३ रोजी गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. या प्रसंगी विशेष शैक्षणिकतज्ञ संदेश जाधव व शैलजा मुळे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले.
नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, नवी मुंबईत विकासाची कामे चांगली होत आहेत. सर्वांच्या सहकार्यामुळे आपले शहर नेहमीच आघाडीवर राहिले आहे. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या खूप संधी उपलब्ध आहेत. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नवीन मुंबईत अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. आपणास केव्हाही गरज लागल्यास मला किंवा आमच्या कार्यकर्त्यांना भेटा. आम्ही आपले प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करू. याप्रसंगी व्यासपीठावर शैक्षणिक विशेषतज्ञ संदेश जाधव, शैलजा मुळे, संतोष सर, सिने नाट्यकलाकार राम काजरोलकर, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, समाजसेविका शिल्पा ठाकूर, शैलजा पाटील, समाजसेवक गणेश कमळे, दत्ता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री. जगदीश पाटील, दंडवते मॅडम, मंदाताई कुंजीर, कविता गाढवे,अशोक कवडे, रामदास आतकरी, राजू सैद, पानमंद सर, सुनील चव्हाण, आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व सानपाडा येथील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा