जागतिक शांततेसाठी बौध्दधम्माचे अतुलनीय योगदान - प्रा. डॉ. शास्त्रज्ञ सिद्धार्थ जोंधळे

 

धर्माबाद - आंतरराष्ट्रीय परिसंवादात आयोजन कोलकत्ता स्थित सिद्धार्थ युनायटेड सोशल वेल्फेअर मिशन आयोजीत आंतरराष्ट्रीय परिषदेत अनेक राष्ट्रातून नामवंत अभ्यासक व जगविख्यात मान्यवर सहभागी झाले होते, या परिषदेच्या अध्यक्षस्थानी नांदेड येथील जगविख्यात पाली व धम्माचे गाढे अभ्यासक प्रा शास्त्रज्ञ डॉ. सिद्धार्थ जोंधळे सर  उपस्थित होते या ठिकाणी त्यांच्या “पीस ऑफ विस्डम (भाग-2)” या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून डॉ. भिक्खूनी टी एन जिओई हुओंग, प्रख्यात लेखिका, विद्वान बौद्ध अभ्यासिका, आंतरराष्ट्रीय परोपकारी आणि हुओंग सेन बौद्ध मंदिर, कॅलिफोर्निया व अमेरिका येथील संस्थापक व सहसंचालीका आदी उपस्थित होत्या. भारतातील व परदेशातील अनेक नामांकित भिक्खूनी व भिक्खू यांच्या  उपस्थित परिषद संपन्न झाली. या परिषदेमध्ये प्रा डॉ सिद्धार्थ एम जोंधळे यांच्या धम्मावान पत्नी आयु. ऋतूजा सिध्दार्थ जोंधळे व कन्या कु. देशना सिध्दार्थ जोंधळे यांनी ही आपले प्रबंध सादर केले."पीस ऑफ विस्डम" या पुस्तकांमध्ये शास्त्रज्ञ डॉ. जोंधळे यांनी बुद्धिझम मधुन विविध आजार व कॅन्सर या आजाराचा सिद्धांत जगासमोर नव्याने मांडला. वैश्विक डॉ.बुद्ध प्रिय महाथेरो  यांनी डॉ. सिद्धार्थ जोंधळे यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या