वाडीपुयड येथील शाळेत स्वतः घेतले वर्ग ।
नांदेड दि. जिल्हा परिषदेच्या प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी मुदखेड तालुक्यातील विविध शाळांना भेटी देऊन शालेय उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी तिसरी व सातवीच्या वर्गात स्वतः पाठ घेतला आणि विद्यार्थ्यांशी संवाद केला.
शिक्षकांचे पाठ निरीक्षण, शालेय पोषण आहाराची पाहणी, सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, पूर्व चाचणीचे पेपर्स ,शालेय मोफत पाठ्यपुस्तके ,गणवेश आदी उपक्रमांची पाहणी केली.शिक्षकांना अध्ययन अध्यापनाबाबत मार्गदर्शन केले.
पंचायत समिती मुदखेड येथील कार्यालयात भेट देऊन कार्यालयातील विषय तज्ञ, विशेष शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्याशी संवाद केला. शालेय गुणवत्ता विकासासाठी सर्वांनी कटिबद्ध राहून शालेय भेटी वाढविल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले. यावेळी घेतलेल्या आढावा बैठकीत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे, शैक्षणिक उपक्रम अमलबजावणी या संदर्भात आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत समग्र शिक्षा चे पर्याय शिक्षण प्रमुख डी टी शिरसाठ हे होते.
addComments
टिप्पणी पोस्ट करा