गोदावरी अर्बनची दशकपूर्तीकडे वाटचाल वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन

 


नांदेडदि.५ (प्रतिनिधी) - गोदावरी अर्बननचा प्रवास दहा वर्षांपूर्वी नांदेड सारख्या लहानशा शहरात दहा बाय दहाच्या खोलीतून सुरू झाला.संस्थेचे  संस्थापक खासदार हेमंत पाटील यांच्या दूरदृष्टीतून व अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या नियोजनाखाली पाच राज्यात विस्तार केला आहे. संस्थेकडे १ हजार ९८१ कोटीच्या वर ठेवी असून३ हजार ३०० कोटीपेक्षा अधिकचा व्यवसाय करुन ग्राहकठेविदार आणि सभासदांची मने जिंकली आहेत. सर्वसामान्यांचे हित जोपासणारी ग्राहकप्रिय गोदावरी अर्बन संस्था यंदा दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने सलग दहा दिवस विविध समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष राजश्री पाटीलव्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी माहिती दिली.

गोदावरी अर्बन यंदा दहा वर्ष पूर्ण करत असल्याच्या निमित्ताने बुधवारी (दि.५) पासून गोदावरी अर्बन सामाजिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असूनआज वृद्धाश्रमाला भेट देण्यात येणार असूनया भेटी दरम्यान आश्रमातील निराधार वृद्धांसोबत वेळ घालवणेगोदावरी परिवार आपल्या सोबत असल्याची त्यांच्या मनात भावना निर्माण करणेमिष्ठांन्न भोजन देणे६ जुलैला शाखा स्तरावर सर्वोत्तम जाहिरात तयार करणे७ जुलैला वृक्षारोपण उपक्रमांतर्गत किमान ५ झाडे लावणे आणि लावलेल्या झाडांच्या संगोपणाची जबाबदारी घेणे८ जुलैला सातवीआठवी आणि नववीसाठी शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील सहभागी सर्व विद्यार्थ्यांना गोदावरी अर्बन कडून प्रमाणपत्ररोख बक्षीस दिले जाणार आहे. शिवाय विजयी स्पर्धकाचे वार्षिक अहवालात रेखाचित्र फोटोसह मुद्रित केली जाणार आहे. ९ जुलैला डस्टबिन वितरण१० जुलैला छत्री वितरण वरील दोन्ही उपक्रम हे मुख्य कार्यालय स्तरावर राबवले जाणार आहेत. ११ जुलैला स्थानिक सामाजिक संस्थेसोबत स्वच्छता मोहीम व इतर असे अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. १२ जुलैला यशोगाथा भेट या उपक्रमांतर्गत ग्राहकांना भेटी देवून त्यांच्या व्यवसायाबद्दलची विचारपूस केली जाणार आहे. १३ जुलैला पावसापासून बचाव व्हावा म्हणून भाजी विक्रेतासफाई कर्मचारीकचरा वेचणारावृत्तपत्र विक्रेता यांना पुष्पगुच्छ देऊन रेनकोट भेट देत त्यांच्या कार्याप्रती समर्पणाची भावना व्यक्त करुन त्यांचे अभिनंदन केले जाणार आहे.  तर शेवटच्या दिवशी १४ जुलै रोजी गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्य मुख्य कार्यालयात टॉक शो चे आयोजन करण्यात आले असल्याची अध्यक्ष राजश्री पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी  माहिती दिली

टिप्पण्या