दिवंगत कॉ.नागापूरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त शुक्रवारी अभिवादन सभा

नांदेड/प्रतिनिधी-प्रख्यात स्वातंत्र्यता सैनानी, कामगार नेते दिवंगत कॉ.अनंतराव नागापूरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त शुक्रवार दि.7 जुलै रोजी दुपारी 3 वाजता भाकप कार्यालयात अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते ऍड.व्यंकटराव करखेलीकर, पीपल्स महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ.बालाजी कोम्पलवार, प्रा.डॉ. अशोक सिद्धेवाड,  यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास सर्व क्षेत्रातील संघटीत, असंघटीत कामगार, कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कॉ.अनंतराव नागापूरकर प्रतिष्ठाणच्यावतीने राज गोडबोले, कॉ.के.के. जांबकर, कॉ.विजय गाभणे, भाकपचे जिल्हासचिव कॉ.शिवाजी फुलवळे, कॉ.गणेश संदुपटला,  कॉ.देवराव नारे आदींनी केले आहे.
टिप्पण्या