आज खरी गरज आहे असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळवून देण्याची! सचिन अहिर यांची कार्यकर्ता संमेलनात ग्वाही*


    लोणावळा दि.२ :आज‌ ग्रॅच्युइटी,प्रॉव्हिडंट फंड आणि आरोग्य सुविधे सारख्या हक्का पासून वंचित असलेल्या ९६ टक्के कामगारांना किमान वेतनही धड मिळत नाही,अशा असंघटित क्षेत्रातील कामगारां ना संघटित करून न्याय मिळवून देण्याचे काम हाती घ्यावे लागेल, अशी‌ ग्वाही युनियनचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ यांनी येथे कामगारांच्या संम्मेलनात बोलतांना दिली.

   आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखालील राज्यभर विखुरलेल्या,बी.के.एस. संलग्न"महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या अधिपात्या खालिल कारखाने आणि आस्थापनाच्या कामगार प्रतिनिधींचे द्वि दिवशीय कार्यकर्ता संम्मेलन लोणावळा येथील करमणूक गृहात पार पडले.दि.१ आणि २ जुलै रोजी पार पडलेल्या कार्यकर्ता संम्मेलनात पहिल्या दिवशी शनिवारी दिवसभर प्रशिक्षण शिबिर पार पडले.तर रविवारी सायंकाळी या कार्यकर्ता संम्मेलनाचा समारोप संघटनेचे अध्यक्ष शिवसेनेचे उपनेते आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या भाषणाने झाला.   

   प्रारंभी युनियनचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी आपल्या प्रास्ताविकात आजचा कामगार सूज्ञ आणि अभ्यासू असावयास हवा,या साठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले असल्याचे सांगितले. 

    या दोन दिवसाच्या कार्यकर्ता संम्मेलना साठी मुंबई,नवीमुंबई, ठाणे,कल्याण,अंबरनाथ,रायगड, रत्नागिरी,पुणे,औरंगाबाद, कोल्हापूर,गुजरात आदि ठिकाणाच्या कारखान्यातील जवळपास १७५ युनियन प्रतिनिधी उपस्थित होते.

     अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आपल्या भाषणात पुढे म्हणाले,आज अवघे ४ टक्के कामगार संघटित असून त्यांनाच फक्त

सामाजिक सुरक्षितता आणि आरोग्य विषयक हक्क कायद्याने मिळत आहेत.उर्वरित ९६ टक्के कामगार असुरक्षिततेचे जीवन जगत आहेत.त्यांना कर्तव्य बुध्दीने संघटित करण्यासाठी संघटित क्षेत्रातील कामगार कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे.आज या उद्योगातील कंत्राटदार लीडर बनले आहेत,या बाबत नापसंती व्यक्त केली. कामगारांना मारक तर मालकशाहिला तारक ठरलेल्या केंद्र सरकारच्या "फोर लेबर कोड बिला"वर टीका करून सचिन अहिर यांनी कामगारांना भेडसावणाऱ्या अनेकविध प्रश्नावर कामगारांना संघटित ताकद मजबूत करण्याचे आवाहन केले.

    आदल्या दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरात नवीन तंत्रज्ञान,रोजगार प्रशिक्षण,रोजगाराच्या संधी,कामगार अहितकारक चार कामगार सहिता,सामाजिक सुरक्षितता आणि असंघटित कामगार समस्येवर प्रशिक्षण शिबिरात अरविंद श्रोत्री, राजेंद्र गिरी, केंद्रीय कामगार शिक्षण केंद्राचे शिक्षणाधिकारी चंद्रकांत जगताप,चंदन कुमार आदी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.आंबेकर श्रम संशोधन संस्थेचे संचालक जी.बी. गावडे, रा.मि.म.संघाच्या शिक्षण विभागाचे प्रमुख-उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षणशिबिर पार पडले.उपाध्यक्ष राजन लाड,मा.नगरसेवक सुनिल (लाली) अहिर, संजय कदम, मिलिंद तांबडे,उत्तम गिते,अण्णा शिर्सेकर, निवृत्ती देसाई, शिवाजी काळे,साई निकम,किशोर रहाटे,आवधानी पांडे, बाळासावडावकर ,ईश्वर वाघ आदींनी आपले विचार समारोप प्रसंगी मांडले.वहातुक संघटना प्रमुख सुनिल बोरकर, लोकणावळाचे माजी नगराध्यक्ष राजू गवळी.पुणे जिल्हा सल्लागार बबनराव भेगडे,माझगाव डॉक वर्कर्स युनियनचे दीपक यादव,ऍड नितिन भवर यांचे विशेष सहकार्य लाभले.मान:शांती केंद्राच्या स्वाती आलुरकर आणि त्यांचे सहयोगी यांचे मनःशांतीवरील व्याख्यान विशेष उद्बोधक ठरले.

टिप्पण्या