जाहुर(वार्ताहर ) गेल्या दोन ते चार दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राजुरा परिसरातील नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे. मुके जनावर खुट्याला उपाशी आहे म्हणत राजुरा येथील प्रदिप सायबू बोयाळे हा २४ वर्षाचा मुलगा २७ जुलै रोजी सकाळी आकरा च्या सुमारास दावनीची शेळी सोडून चारवायला गेला असता राजुरा ते उंद्री तांडा रस्त्यावरील मोठ्या व्होळात शेळीचा पाय घसरून शेळी वाहून चाललेली पाहून शेळीला वाचवण्यासाठी गेलेला प्रदिप ही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. पाण्याचा प्रवाह इतका जोराचा होता की पाण्यात पडलेला हा मुलगा आणि शेळी पुन्हा दिसलेच नसल्याचे गावकरी सांगत आहेत.
राजुरा परिवारातील लहान मोठ्या नदी नाल्यांचा पूर आजून ही ओसरला नाही धोक्याच्या पातळीवर नदी नाले वाहू लागले आहेत. प्रदिप सायबू बोयाळे हा मुळचा बिलोली तालुक्यातील कुंचेली या गावचा असून आपली उपजिवीका चालवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन आई भहीन भावासोबत राजुरा या आजोळ गावी राहत होता वडिलांच्या नंतर तो घरात एकमेव कर्ता गडी होता आई सोबत मोलमजुरी करणाऱ्या प्रदिपचा त्याच्या आईला मोठा आधार होता. मुक्या जनावराची किव करत शेळी चारवाला गेलेल्या प्रदिपवर काळानेच घाला घातल्याने या कुटूबावर दुखाचे मोठे संकट कोसळले आहे. २७ जुलै रोजी सकाळी आकरा वाजल्या पासून राजुरा गावा लगतच्या व्होळात वाहून गेलेल्या प्रदिप सायबू बोयाळे या मुलाचा शोधा सुरू आहे आध्याप ही तो सापडलेला नाही. आपलाच वार्ताहर अविनाश घाटे
addComments
टिप्पणी पोस्ट करा