सेलू : परभणी जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी सेलू तालुका क्रीडा संकुल तसेच नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या परिसरातील शासनाच्या क्रीडा सुविधा योजनेअंतर्गत बंदिस्त प्रेक्षागृह आदी क्रीडा विषयक कामांची २० जुलै रोजी पाहणी करून माहिती घेतली. तालुका क्रीडा संकुलातील बंदीस्त क्रीडा हॉल, प्रवेशव्दार यांची पाहाणी करुन पुढील कामकाजाची माहिती दिली. यामध्ये संरक्षक भिंत, २०० मीटर धावपथ तयार करण्यात बाबत सूचना दिल्या. तसेच क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय व परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या बंदीस्त प्रेक्षागृह बांधकामांची पाहणी केली व सूचना दिल्या. या प्रसंगी नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, शेलैंद्रसिंग गौतम, रणजित काकडे यांचा संस्थेच्यावतीने डॉ.एस.एम.लोया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सचिव डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, सदस्य नंदकिशोर बाहेती, मुख्याध्यापक नारायण सोळंके एस.व्ही.पाटील, किरण देशपांडे, डी.डी.सोन्नेकर, गणेश माळवे, सतिश नावाडे, प्रशांत नाईक, कैलास आदी उपस्थित होते. जयकुमार टेंभरे यांच्या हस्ते नूतन विद्यालय टेबल टेनिस हॉलचे उद्घाटन करण्यात आले. मैदानावर खेळणारे हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, सॉफ्टबॉल, बेसबॉल, सेपक टकरा, योगासन खेळाडूंना भेटून प्रोत्साहन दिले. या प्रसंगी सेलू तालुका क्रीडा अधिकारी शेलैंद्रसिंग गौतम, रणजित काकडे, तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बळीराम माने, कैलास टेहरे, नीरज नाईकवाडे आदींची उपस्थिती होती.सेलूतील क्रीडाविषयक कामांची जिल्हा क्रीडाधिकार्यांकडून पाहणी
सेलूतील क्रीडाविषयक कामांची जिल्हा क्रीडाधिकार्यांकडून पाहणी
addComments
टिप्पणी पोस्ट करा