मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदी विभागामधील कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते श्री. शेखर बर्वे यांचा ८ जुलै २०२३ रोजी सेवानिवृत्तीबद्दल परिवार ८३ तर्फे पुणे जिल्ह्यामधील खेड शिवापुर जवळील यतार्थ रिसॉर्टमध्ये निसर्गरम्य अशा वातावरणात पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ, व सोन्याचे नाणे भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार झाला.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदी विभागातील परिवार ८३ ची पावसाळी कौटुंबिक सहल यतार्थ वैभव रिसोर्ट, खेड शिवापूर, नसरापूर फाटा, पुणे येथे तोरणा व राजगड किल्ल्याजवळ निसर्गरम्य वातावरणात आयोजित करण्यात आली होती.याप्रसंगी सेवानिवृत्त श्री. शेखर बर्वे व श्री. यदुनाथ गुजर यांचा शाल, श्रीफळ,सोन्याचे नाणे, मिठाई, साडी व भेटवस्तू देऊन सपत्नीक जाहिर सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळा मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिध्दीप्रमुख मारुती विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. सत्कार सोहळ्यात कार्यकर्ते जे.पी.मुजावर, पी.आर.परब, नामदेव घोडके, शिवाजी सावंत, संजय बुतकर, रोहीत बर्वे, स्नेहल बर्वे, नूतन गरुड, मारुती विश्वासराव आदी मान्यवरांची शेखर बर्वे यांच्या मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यावर आधारित शुभेच्छापर भाषणे झाली. सत्काराला उत्तर शेखर बर्वे यांनी दिले. या सत्कार सोहळ्यात मुलांचा गुणगौरव, नातवंडे व सुनांचा देखील जाहीर सत्कार करण्यात आला. उपस्थित कुटुंबांना वैयक्तिक भेटवस्तू देण्यात आल्या. या सहलीतून नेहमीच दुसऱ्यांना आनंद देण्याचा कार्यकर्ते प्रयत्न करतात.
दोन दिवस परिवार ८३ च्या उपस्थित कुटुंबांनी निसर्गरम्य अशा पावसाळी वातावरणात चांगला आनंद घेतला. कौटुंबिक सहली दरम्यान जे.पी.मुजावर, प्रकाश परब, शेखर बर्वे, नामदेव घोडके, संजय बुतकर यांनी नाश्ता व जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती. सर्वांच्या सहकार्यामुळेच परिवार ८३ ची कौटुंबिक सहल यशस्वी झाली त्याबद्दल शेखर बर्वे यांनी सर्वांना धन्यवाद दिले.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा