गंगाखेड मध्ये मोफत शेअर मार्केट सेमिनारला प्रतिसाद



 गंगाखेड( प्रतिनिधी). दिनांक 30 जुलै, रविवारी शहरातील द्वारका फंक्शन हॉल या ठिकाणी शेअर मार्केट विषयी माहिती देणारा सेमिनार संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंबाजोगाई येथील बी एस इ सर्टिफाइड ॲडव्हायझर व एक्सपर्ट प्रा. आनंद लांडगे यांनी उपस्थित तरुण ,युवक यांना शेअर मार्केट या विषयावर संवादाच्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन केले. तसेच लोकांमध्ये असलेली शेअर मार्केट विषयीची समजूत, भीती दूर केली. तसेच शेअर मार्केटच्या माध्यमातून योग्य माहिती घेऊन आपण कशा पद्धतीने पैसे कमवू शकतो याविषयी विशेष मार्गदर्शन केले. व्यासपीठावर माहेश्वरी सभेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ मंत्री, दत्ता घोडबांड, प्रशांत सावंत, मनोहर व्हावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरु इंग्लिश अकॅडमीचे प्रा. अंकुश चव्हाण व निर्मिती कॉम्प्युटरचे नितीन कांबळे , अमीर खान, अभिजित थिटे,विजय बाबर यांनी विशेष सहकार्य केले.

टिप्पण्या