जेष्ठ अभिनेते राम काजरोलकर यांचा वाढदिवस साजरा




सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष, सिनेअभिनेते, नाट्यकलाकार व राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पारितोषिक विजेते राम काजरोलकर यांना कै. सिताराम मास्तर उद्यानात हास्य क्लब योगा व गार्डन परिवारातर्फे ८५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी हास्य क्लब योगाचे योगशिक्षक भरत खरात, नवी मुंबई शिवसेना उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्याराव, शाखाप्रमुख अजय पवार ( उध्दव ठाकरे गट ) पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते मारुती शिंदे, महादेव पाटील, आनंद कुंभार, मराठा विकास प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर जाधव, शिवाजीराव पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे सानपाडा येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन सामाजिक कार्यकर्ते भाऊ भापकर, गणेश कमळे, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे आजी-माजी पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ, शाल, मिठाई व भेटवस्तू देऊन राम काजरोलकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
मुंबई शहराचा कणा असलेला कामगार मुंबईतून हद्दपार झाला _* अशोक नायगावकर
इमेज