प्रतिनिधी - महेंद्र पुरी हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात परभणी येथुन बदलीवर आलेले कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक गणेश राहिरे यांनी औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचा पदभार स्विकारला असुन ठाणे हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व सर्व सामान्य नागरिक यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी ग्लोबल मराठवाडा शी बोलताना व्यक्त केले आहे.
पोलिस निरीक्षक गणेश राहिरे यांनी परभणी येथे कार्यरत असतांना परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात उत्कृष्ट कामगिरी बजावली. परभणी जिल्ह्यातील संवेदनशिल तालुका असलेल्या पाथरी येथे रुजु झाल्यानंतर उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यानंतर त्यांनी जिंतुर पोलिस ठाण्यात सुद्धा उत्कृष्ट सेवा बजावली. कायद्यावर बोट ठेवून कर्तव्य बजावण्याची उत्कृष्ट शैली त्यांना आवगत आहे. ठाणे हद्दीतील सर्व गावातील पोलिस,पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच यांच्या शी बिट अमलदारा मार्फत नाही तर थेट संपर्क ठेवणारे अधिकारी म्हणजे राहिरे साहेब. नागनाथाच्या पावन भुमीत सेवा बजावण्याची संधी मला मिळाली असुन मी सर्व सामान्य नागरिक यांच्या संपर्कात राहुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. गावातील छोटे मोठे तंटे गावपातळीवर मिटवीण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कायदा हातात घेणाराची गय केली जाणार नसल्याचा इशारा ही त्यांनी गुन्हेगारांना दिला आहे. पोलिस दलातील शांत, संयमी, अभ्यासु व्यक्तीमत्व म्हणुन गणेश राहिरे यांची महाराष्ट्र पोलिस दलात ओळख आहे. राहिरे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा...
addComments
टिप्पणी पोस्ट करा