तेरा वर्षांपासून फरार आरोपीच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या


प्रतिनिधी - महेंद्र पुरी हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यातील खांबाळा येथील आरोपीने एका नाबालीक मुलिस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला होता या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात पिडीतेच्या तक्रारीवरून 3 जुलै 2010 रोजी आरोपींविरुद्ध कलम ,363, 376 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तेंव्हा पासुन आरोपी फरार होता. तब्बल तेरा वर्षानंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील खांबाळा येथील आरोपी गंगाराम यल्लपा शांकट याने एका 14 वर्षिय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळून नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी विरूद्ध तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल होताच आरोपी जिल्हयातुन फरार झाला होता. तो अद्याप पर्यंत पोलिसांना गुंगारा देत होता. फरार आरोपीची शोध मोहीम जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्यात राबवली असुन या मोहिमे दरम्यान गंभीर गुन्ह्यात मागील तेरा वर्षांपासून फरार असलेला आरोपीचा जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष मुपडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष वाठोरे, पोलिस कर्मचारी खोडवे, विजेश चव्हाण यांनी दोन दिवसात सदर आरोपीचा पुणे, अकोला, बिड जिल्ह्यात शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. त्या नंतर 14 जुलै शुक्रवार रोजी ग्रामीण पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, सदर आरोपी हा बोल्डा वाडी येथे नातेवाईक यांच्या घरी आलेला आहे. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी शिताफीने सापळा रचून सदर आरोपीस ताब्यात घेतले. मागील तेरा वर्षांपासून फरार असलेला आरोपी स्वतः चे नाव बदलून विजय देवकर या नावाने वावरत होता.

*अंगठ्यावरून आरोपीची पटली ओळख*

 *तब्बल तेरा वर्षांपासून गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीचा पोलीसांकडे ना फोटो होता ना आधारकार्ड आरोपीचा शोध घेणे खुप आवघड होते. पण सदर आरोपीच्या डाव्या हाताचा अंगठा वाकडा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या कामगीरी चे जिल्हाभरात कौतुक होत आहे..*

टिप्पण्या