नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स आॅफ इंडिया न्यूसीच्या वतीने ८ मार्च २०२३ रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून "न्यूसी स्त्री शक्ती सपोर्ट" ही खास महिलांसाठी कल्याणकारी योजना सादर केली आहे . नौवहन क्षेत्रात महिलांना प्रवेशासाठी प्रोत्साहित करण्यासाठी न्यूसीतर्फे हा उपक्रम राबविला जाणार आहे.
" ट्रेनिंग शिप रेहमान" येथे १ जुलै २०२३ रोजी सुरू झालेल्या जीपी रेटिंग कोर्ससाठी देशभरातील १८ महिला प्रशिक्षणार्थिंना न्यूसी तर्फे आर्थिक मदत केली गेली. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना जहाज ऊद्योगांनी नोकरीची हमी दिलेली आहे. लैगिंक समानतेच्या दिशेकडे न्यूसीने हे एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जानेवारी २०२४ " न्यूसी अँकेडमी गोवा बँच " साठी ३१ आॅगस्ट २०२३ पर्यंत अर्ज दाखल करावयाचे आहेत. आपल्या जिल्ह्यातील तरूण महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन न्युसीचे जनरल सेक्रेटरी व खजिनदार मिलिंद कांदळगावकर यांनी केले आहे.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा