प्रतिनिधी - महेंद्र पुरी हिंगोली
हिंगोली येथील शिंदे गटाचे नगरसेवक तथा युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम यांच्यावर ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांच्याकडून खोटा गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र सुरू असुन यावर प्रतिक्रिया देतांना हिंगोली चे नगरसेवक राम कदम यांनी मी पौळ यांना कुठलीही धमकी दिली नसुन राजकिय द्वेषातुन अयोध्या पौळ यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र रचले असल्याचे पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांच्यात सोशल मिडीयावर शाब्दिक चकमक सुरू आहे. दोन्ही गटाकडून एक मेकांवर आरोप प्रतिआरोप करण्यात येत आहेत. यातच दोन दिवसांपुर्वी ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. सदर फोटो राम कदम यांनी व्हायरल केल्याचा आरोप अयोध्या पौळ यांनी सोशल मिडिया च्या माध्यमातून केला होता मात्र राम कदम यांनी सदर आरोप फेटाळून लावत मी कुठलेही फोटो माझ्या आयडीवरून व्हायरल केलेले नसल्याचे सांगितले आहे. तसेच मी अयोध्या पौळ यांना फोनवरून कुठलीही जिवे मारण्याची धमकी दिली नसल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मी जर त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली असेल तर त्यांनी तसे रेकार्डीग व्हायरल करावे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी अयोध्या पौळ यांचा हा केवीलवाना प्रयत्न असल्याचे राम कदम यांनी सांगितले आहे. तर अयोध्या पौळ यांच्यावर प्रफुल्ल सुर्यवंशी यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत नमुद करण्यात आले आहे की, अयोध्या पौळ यांना फिर्यादींनी फोन करून आमदार बांगर यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडियावर का टाकता अशी विचारणा केली असता अयोध्या पौळ यांनी मी सोशल मिडियावर संतोष बांगर व राम कदम यांची बदनामी करते. मी अश्लील मजकुर सोशल मिडीयावर पोस्ट करते असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुरमे हे करीत आहेत.
addComments
टिप्पणी पोस्ट करा