दिनांक :- १६ जुलै हा दिवस जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. व्यंकटेश वांगवाड सर हे या खेळाचे जनक आहेत. यानी या खेळाची निर्माती केली आहे. त्यांच्या या अनमोल योगदाना निमित्तच १६ जुलै हा त्यांचा जन्म दिवस जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिवस म्हणून साजरा केला जातो.या दिवशी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात आणि भारताच्या विविध राज्यात स्पर्धा, चर्चासत्र,कार्यशाळा, वृक्षारोपण अश्या विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात येतो. या वर्षीही अश्याच प्रकारे हा दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन :- पुणेयेथे महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे महविद्यालयात या खेळाची पहिलीमुहूर्तमेढ रचली गेली होती. त्याच ठिकाणी काल प्रमुखपाहुणे अहमदपूरचे माजी आमदार बबरुवाहन खंदाडे ,या संस्थेचेसचिव रोहन दामले, मा. प्राचार्या डॉ.कमल वाघचौरे, टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आनंद खरे माजी प्राचार्य डॉ.कुकाले, मिलिंद जावडेकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत या खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड यांना त्याच्या अनमोल योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. यामध्ये त्यांचे माजी विद्यार्थी, संस्था आप्त मित्र यांचा समावेश होता. यावेळी डॉ. वांगवाड सर यांनी आपल्या या टेनिस व्हॉलीबॉल च्या आजवरच्या प्रवासाबद्दल सर्वांनी माहिती दिली. आनंद खरे यांनी सांगितले की सरांनी हा खेळजगाला दिला आहे यामध्ये त्यांचे अपर कष्ट आहेत. त्यांच्यामुळेच आज टेनीस व्हॉलीबॉलने या रौप्य यशस्वी महोत्सवी वर्षापर्यंत मजल मारली आहे असे सांगून त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला. माजी आमदार यांनी डॉ. वांगवाड सरांना आजच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या शुभेच्या तर दिल्याचं शिवाय आम्हाला पुढे टेनिस व्हॉलीबॉलचा ५० वा महोत्सव आणि सरांचा १०० वा डायमंड जुबली महोत्सव साजरा करण्यासाठी सरांना ईश्वर सरांना शतायुष्य देणार अशी त्यांनी ईश्वर चरणी प्रार्थना केली.
राज्य सचिव गणेश माळवे व संपादक सुधीर भालेराव यांनी महाराष्ट्र स्पोर्ट्स वतीने विशेषांक प्रकाशित करण्यात आला. नाशिक मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन –
विविध राज्यांमध्ये व जिल्हयात जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. रितेश वांगवाड, अजितकुमार फरांदे, प्रफुल्लकुमार बन्सोडे, संदिप भोसले, सौरभ माळवे, संजय पावडे,
नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेबरोबरच विविध भागात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खेळाडूनी वृक्षलावून हा दिवस साजरा केला. टेनिस व्हॉलीबॉलचे पदाधिकारी क्रीडा शिक्षक आणि कवी राजेंद्र सोमवंशी यानी टेनीस व्हॉलीबॉल हा खेळ आणि या खेळाचे जनक डॉ. वांगवाड सर यांच्या कार्यावर सुंदर कवीता तयार केली आणि यावेळी ही कवीता सादर केली. या कार्यक्रमासाठी किरण घोलप, मनोज म्हसके, बंडू जमदाडे आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
ठाणे जिल्हा टेनिस हॉलीबॉल असोसिएशन कडून वृक्ष रोपण , विविध शाळांना बॉल देऊन ,खेळाचे पुस्तक देऊन टेनिसव्हॉलीबॉल खेळाचे जनक श्री.व्यंकटेश वांगवाड सर यांचा आज १६ जुलै रोजी ७५वा वाढदिवस साजरा केला. ठाणे जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी यांच्या कडून सरांच्या पुढील भावी आयुष्यासाठी आमच्या सर्वांकडून सरांना वाढदिवसाच्या खूप - खूप शुभेच्छा:
नागपूर जिल्हा टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशन वतीने दि. १६ जुलै रोजी मा. डॉ. व्यंकटेश वांगवाड सर यांचा अमृतमहोत्सवी वर्ष व टेनिस व्हॉलीबॉल चार रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करताना टेनिस व्हॉलीबॉल राज्य सचिव गणेश माळवे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य हनुमंत लुंगे, इक्बाल मिर्झा, शेख चॉद, रामचंद्र दत्तू, डॉ.परवेज खान,मंडल सर, नागपूर जिल्हा सचिव चेतन महाडिक, व राष्ट्रीय खेळाडू
टेनिस व्हॉलीबॉल चे जनक,फादर ऑफ टेनिस व्हॉलीबॉल मा डॉ व्यंकटेश वांगवाड साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन माजलगांव या ठिकाणी टेनिस व्हॉलीबॉल चे नवीन मैदान चालु करण्यात आलेे, या नवीन मैदानाचे उदघाटन मा रामेश्वरजी कोरडे सर (विभागीय सचीव औरंगाबाद) व मा शेख के जे सर (बीड जिल्हा सचीव)यांच्या हस्ते करण्यात आले
जिल्हास्तरीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा नांदेड, सोलापूर, बीड जिल्ह्यात आयोजन करण्यात आले.काशीम खान, संतोष खेंडे, आशिष ओबेरॉय,
addComments
टिप्पणी पोस्ट करा