नपा प्रशासनाने स्मशानभूमी व कब्रस्थानात लाईट, पाणी व वृक्षारोपण करावे - बबलु मुल्ला

 



आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी 

     शहरातील सर्व हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानात नगर परिषद प्रशासनाने लाईट, पाणी व काटेरी झाडे-झुडपे काढून वृक्षारोपण करावे अशी मागणी आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफचे मुखेड प्रभारी शेख हसनोद्दीन उर्फ बबलु मुल्ला यांनी मुख्याधिकारी विजयकुमार पाटे यांना निवेदनाद्वारे केली.

         नगर परिषदेच्या हद्दीत अनेक मुस्लिम कब्रस्थान व हिंदू स्मशानभूमी आहेत. पण काही ठिकाणी लाईट, पाणी, स्वच्छता आदींची व्यवस्था नसल्याने मयतावर दफनविधी पार पाडताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, कब्रस्थानात काटेरी झाडे झुडपे वाढल्याने विषारी प्राण्यांचा वावर वाढला आहे. लाईट ची व्यवस्था नसल्याने रात्री दफनविधी साठी अडचणी येत आहेत. म्हणून नगर परिषद प्रशासनाने जनतेच्या यामागणीकडे विशेष लक्ष देऊन शहरातील हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्थानात हायमॅक्स लाईट, पाणी, व सद्या पावसाळा सुरु झाल्याने काटेरी झाडेझुडपे काढून त्याठिकाणी वृक्षारोपण करावे. जेणेकरुन शहराच्या सौदर्यांत भर पडेल. अशी मागणी मुख्याधिकारी विजयकुमार पाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी आॅ इंडिया तन्जीम ए इन्साफचे मुखेड प्रभारी शेख हसनोद्दीन उर्फ बबलु मुल्ला, रब्बानीखाँ पठाण सावरगावकर, युवा कार्यकर्ते अदनान पाशा, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलावर साब जाहूरकर, अर्शद परदेसी, बाबा मणियार, शेख वसीम मुल्ला, सय्यद मुजीब आदी उपस्थित होते.

टिप्पण्या