पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यात नरसिंह विद्यालय रांजणी या शाळेमध्ये १९९० साली इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेले जवळजवळ १०० विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक यांचे २३ जुलै २०२३ रोजी ३३ वर्षांनी एकत्रित येऊन ऐतिहासिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. या संमेलनात सुरुवातीला नाष्टा, स्वागत, परिचय, अविस्मरणीय क्षण सांगणारे मनोगते, मान्यवरांची भाषणे, असा हा कायमचा आठवणीत राहणारा सुंदर असा कार्यक्रम झाला. स्नेहभोजनाप्रसंगी मासवडीचे जेवण अतिशय सुंदर होते. त्याचप्रमाणे चितळ्यांचा गुलाबजाम असल्यामुळे सर्वांचाच आनंद द्विगुणीत झाला. असा हा सुंदर व देखणा कार्यक्रम झाल्यामुळे सर्वांच्याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. यापुढेही दरवर्षी असाच कार्यक्रम मित्रांनी घडून आणावा, अशा सूचनाही मनोगतामध्ये देण्यात आल्या. स्नेहसंमेलनाचे नियोजन करणारे गिरीश,जयसिंग, सुरेश, राजेंद्र भंडारी, राजेंद्र भोर, तुकाराम, विलास मिंडे, दिलीप, प्रदीप, दिनेश या मित्रांनी व त्यांना सहकार्य करणाऱ्यानी हा कार्यक्रम घडून आणण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांना धन्यवाद देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
नरसिंह विद्यालयात ३३ वर्षांनी विद्यार्थ्यांचे ऐतिहासिक स्नेहसंमेलन संपन्न*
• Global Marathwada

addComments
टिप्पणी पोस्ट करा