नवी मुंबईत सानपाडा येथे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शाखाप्रमुख अजय पवार यांच्या संकल्पनेतून शिवसेना परिवार व सुयोग मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जुलै २०२३ रोजी सकाळी सेक्टर २ येथील खेळाच्या मैदानात नवी मुंबईचे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख श्री. मिलिंद सुर्यराव,माजी नगरसेवक व उपशहर प्रमुख श्री. सोमनाथ वास्कर, यांच्या प्रमुख उपस्थित वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
शाखाप्रमुख अजय पवार यांच्या संकल्पनेतून सुयोग मित्र परिवार मागील १५ वर्ष सानपाड्यात विविध ठिकाणी रस्त्याच्याकडेला, मैदानात वृक्षारोपण करतात व त्यांच्या सोबत मिळून शिवसेना शाखा क्र.७६ ही संयुक्तपणे हा उपक्रम राबवते. वृक्षारोपण झाल्यावर पुढे त्या झाडांचे संगोपण,खत, पाणी व छाटणी ही सर्व कामे सुयोग मित्र परिवार न चुकता करतात. याप्रसंगी जिल्हाप्रमुख श्री. विठ्ठल मोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, झाडे आपणांस ऊन सहन करून सावली व फळे देते. त्याप्रमाणे आपण देखील सामाजिक कार्य करून इतरांना आनंद द्यायचा असतो. शिवसेनेतर्फे वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात, त्यामधीलच वृक्षारोपण हा एक उपक्रम आहे. वृक्षारोपण कार्यक्रमास उपशहर संघटक सौ. वंदना गोडसे,शिवाई महिलामंडळ अध्यक्षा सौ.शुभांगी सुर्यराव,विभाग प्रमुख श्री. सुनील गव्हाणे, विकास वाघुले, सीताराम मास्तर उद्यानातील गार्डन ग्रुप ७.५० चे सदस्य व सानपाड्यातील रहिवाशी मोठ्या प्रमाणात हजर होते. अध्यक्ष सदाशिव तावडे, खजिनदार रणवीर पाटील कार्यकर्ते तेजाभाई वडेल, शामराव मोरे, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव आदी मान्यवर उपस्थित होते. शाखाप्रमुख अजय पवार यांनी वृक्षारोपणा सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा