महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे लोणावळा येथे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यकर्ता संम्मेलन!*


     मुंबई दि.३०:महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या वतीने दि.१ व २ जुलै रोजी राज्यस्तरीय कार्यकर्ता संम्मेलन इम्पिरियल ग्रॅंडले रिसॉर्ट,तुंगारली रोड, इंदिरा नगर चौक,डॉन बास्को,लोकणावळा येथे पार पडत आहे.शनिवार दि.१ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय कामगार चळवळ,नवीन तंत्रज्ञान,रोजंदारी आणि कामगारांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नावर कामगार प्रशिक्षण पार पडेल.या प्रसंगी या विषयावरील तज्ज्ञ अभ्यासक मार्गदर्शन करतील.सरचिटणिस गोविंदराव मोहिते यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन होईल. रविवार दि.२ रोजी संध्याकाळी १२.३० वाजता अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या भाषणाने संमेलनाचा समारोप होईल.संम्मेलनाला राज्य भरातील विविध कारखाना आणि आस्थापनातील प्रतिनिधी उपस्थित राहतील ****

टिप्पण्या