हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी नोव्हेंबर 2022 या महिन्यात सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टॉप 3 पोलिस ठाणे निवडीची योजना सुरू केली. यामध्ये सदर ठाणेदारांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रशस्तीपत्र, रोख बक्षीस जाहीर करून पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी ठाणेदारांचा गौरव करण्याचे ठरवले होते. या योजनेत मागील 8 महिन्यांत कूरूंदा पोलिस ठाणे तब्बल 7 वेळा टॉप 3 पोलिस स्टेशनमध्ये राहिले. यामध्ये 3 वेळा प्रथम क्रमांक 2 वेळा द्वितीय क्रमांक तर 2 वेळा तृतीय क्रमांक मिळुन कूरूंद्याच्या ठाणेदाराने आपल्या कर्तबगार कामगिरीने जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करणे, तक्रार अर्ज व प्रलंबीत प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करणे, चोरी छुपे सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई ची मोहीम राबविणे, तसेच जनता व पोलिस यांचा सुसंवाद वाढवा यासाठी ठाणे हद्दीतील गावांमध्ये विवीध उपक्रम राबविणे, दामीनी पथक पेट्रोलींग, पोलिस दीदी, पोलिस काका, भरोसा सेल, जातीय सलोखा, सामाजिक सदभावना वाढीसाठी कौमी एकता क्रिकेट स्पर्धा चे आयोजन , सतर्कता, रात्रीची गस्त व कोम्बींग आपरेशन इत्यादी माध्यमांतून चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करत असुन जिल्ह्यातील सर्व 13 ही पोलिस स्टेशन वरील सर्व बाबीवर प्रभावी कामगिरी व्हावी यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी प्रत्येक महिन्याला सर्व पोलिस ठाण्याचे मुल्यांकन व सर्वंकष बाबींचा आढावा घेऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टॉप 3 पोलिस ठाण्याची निवड करून त्यांना प्रशस्तीपत्र व बक्षीस देण्याची योजना सुरू केली आहे. सदर योजनेत मागील 8 महिन्यात तब्बल 7 वेळा टॉप 3 पोलिस स्टेशनमध्ये येऊन कूरूंदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरी चे दर्शन घडवीले. यामध्ये 3 वेळा प्रथम क्रमांक, 2 वेळा द्वितीय क्रमांक, 2 वेळा तृतीय क्रमांक पटकावला आहे. कुरूंदा ठाणेदारांना तब्बल सात वेळा रोख बक्षीस, प्रशस्तीपत्र, व सि नोट प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 13 ठाणेदारा पैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी कुरूंदा ठाणेदार यांनी केल्याचे दिसून येत आहे. तब्बल सात वेळा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी सपोनी गजानन मोरे यांचा गौरव केला आहे. पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या या उपक्रमाने उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी ठाणेदारांना प्रोत्साहन मिळत असल्याची माहिती कूरूंदा पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन मोरे यांनी ग्लोबल मराठवाडा प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले आहे. तर कूरूंदा ठाणेदारांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा