प्रतिनिधी - महेंद्र पुरी हिंगोली
हिंगोली जिल्ह्यात मागिल काही वर्षांपासून राशनचा काळा बाजार जोरात सुरु असुन हिंगोली पोलिसांनी राशन माफियावर यापुर्वीही अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत. मात्र या महिन्यात अवघ्या 25 दिवसात एसपिंच्या विशेष पथकाने अवैध राशनवर दुसरी कारवाई केली आहे. या कारवाई वरून जिल्ह्यात राशनचा खुप मोठा काळाबाजार सुरू असल्याचे दिसुन येत आहे. मात्र महसूल प्रशासन का मुग गिळून गप्प आहे हा प्रश्न उपस्थीत होत आहे?. गोरगरीबांना मुबलक दरात गहु, तांदुळ मिळावा व गरीबांचे पोट भरावे म्हणुन शासनाकडून राशन दिल्या जाते. मात्र गरीबाच्या तोंडचा घास काढून घेत. राशन चा काळाबाजार काही राशन माफियांकडून जिल्ह्यात सुरू आहे. राशन चा काळाबाजार कायमस्वरूपी थांबने गरजेचे आहे. मात्र हिंगोलीत हे थांबता थांबेना. 1 जुलै रोजी पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विषेश पथकाने रात्री 1.15 वाजता मिळालेल्या गुप्त माहिती वरून अकोला बायपास येथुन ट्रक क्रमांक एम एच -26 बिई 7533 मध्ये स्वस्त धान्य दुकानातील तांदुळ काळ्या बाजारात चोरटी विक्री करण्यासाठी जात असल्याची असल्याची माहिती मिळाल्यानंतर रिसाला बाजार येथे 1.45 वाजता ट्रक ला थांबून ट्रकचालकास विचारणा केली असता.ट्रक चालक सुर्यकांत स्वामी यांनी ट्रक मध्ये तांदुळ असल्याचे सांगितले. तसेच सदर माल हिंगोली येथील रौफ भाई यांचा असल्याचे सांगितले. सदर ट्रक मध्ये 27 क्विंटल तांदुळ ज्याची किंमत 5 लाख 40 हजार असुन ट्रक ची किंमत 25 लाख आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 30 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर दुसरी कारवाई 24 जुलै च्या रात्री 10 वाजता हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे हद्दीत नर्सि फाट्यावर करण्यात आली असुन विशेष पथकाला मिळालेल्या गुप्त माहिती वरून ट्रक क्रमांक एम एच 04- डिएस 8389 मधे राशनचा शंभर क्विंटल तांदूळ ज्याची किंमत 2 लाख 50 हजार व ट्रक ची किंमत 6 लाख रुपये असा एकुण 8 लाख 50 हजार रूपायांच मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन हिंगोली शहरातील पलटण येथील दोन आरोपीवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर राशन चा माल कुठून आला व मुख्य सुत्रधार कोण याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा