गंगाखेड मध्ये योग दिन उत्साहात साजरा गंगाखेड

 


(प्रतिनिधी)* यावर्षीच्या योग दिनाची थीम वसुधैव कुटुंबकम ही होती या अनुषंगाने दिनांक 21 जून रोजी 9 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शहरातील विविध ठिकाणी योग दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या वतीने गोपीनाथराव मुंडे अन्नछत्र, गोदातट या ठिकाणी योगशिक्षक निखिल वंजारे व अंकुश मदनवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक योगसाधकांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी जि प सदस्य किशनराव भोसले, सचिन महाजन, रमाकांत जोशी, मेजर विश्वनाथ सातपुते, विठ्ठलराव सातपुते, सचिन नावेेकर, राधाकिशन शिंदे, संजय लाला आनावडे आदींनी सहकार्य केले. तर शहरातील सरस्वती विद्यालयात देखील विद्यार्थ्यांनी योगाचे धडे गिरवले. या ठिकाणी पतंजलीच्या योगशिक्षिका अभिलाषा मंत्री व लक्ष्मी खरात यांनी विद्यालयातील जवळपास 200 विद्यार्थिनींना विद्यालयाच्या शेजारी असलेल्या गीता मंडळ या ठिकाणी आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकॉल प्रमाणे योगाचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चीनके काकू, मकरंद चिनके, गोपाळ मंत्री ,स्वप्निल पाटील, अनंत काळे, सारिका संगेवार, अविनाश घोगरे, अभिजीत राजुरकर, बालाजी घुगे, होरगुळे, आदींनी प्रयत्न केले.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत ११ उमेदवार विजयी*
इमेज