*
*गंगाखेड( प्रतिनिधी ).* संत जनाबाई महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी शेख अदनान मतीयोद्दीन याने यावर्षी झालेल्या जे ई ई ॲडव्हान्स परीक्षेत उज्वल यश संपादन करून ही अतिशय अवघड असणारी परीक्षा उत्तीर्ण झाला. या परीक्षेत ऑल इंडिया रँक 3152 मिळवली तसेच एम एच सी इ टी या परीक्षेत 99.06 गुण घेऊन तो उत्तीर्ण झाला त्याबद्दल संत जनाबाई महाविद्यालयातर्फे त्याचा दिनांक 28 जून रोजी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एम.धूत उपप्राचार्य डॉ. सी.बी. सातपुते, प्रा .विजय बेरलीकर, डॉ. राजेश धनजकर, आर.एन. मठपती, पी.जे. खैरे, एम.बी रेवनवार, एस. पी. जोशी, जी.एम. सातपुते, ए.पी. अष्टेकर आदींची उपस्थिती होती.
addComments
टिप्पणी पोस्ट करा