प्रतिनिधी - महेंद्र पुरी हिंगोली
हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा पदभार जी श्रीधर यांनी स्विकारल्यानंतर जिल्ह्यातील गुन्हे व गुन्हेगारांना आळा घालण्याचे काम त्यांनी प्रभावीपणे केले. यामध्ये जिल्ह्याच्या ईतीहासात पहिल्यांदा 18 गुन्हेगारांना एमपीडीए अंतर्गत जेलची हवा खावी लागल्याचे चित्र आहे. हिंगोली जिल्ह्यात अकोला येथून आक्टोबर 2022 मध्ये बदलीवर आलेले जी श्रीधर यांची एक कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून महाराष्ट्र पोलिस दलात ओळख आहे. हिंगोली जिल्ह्यात दाखल होऊन अवघे आठच महिने उलटले असुन त्यांनी या कालावधीत जिल्ह्यातील गुन्हेगारांना सळो की पळो करुन सोडले आहे. त्यांनी शुक्रवार दिनांक 23 जुन रोजी अगामी आषाडी व ईद निमित्ताने पत्रकार परिषद घेऊन बंदोबस्ताची माहिती दिली. यावेळी बकरी ईद निमित्ताने पोलिस प्रशासनाने प्रभावी प्रतिबंधीत कारवाई केली असुन यामध्ये सिआरपीसी कलम 107 प्रमाणे 196, सिआरपीसी कलम,110 प्रमाणे 30, एमपीडिए अंतर्गत 2 ,मपोका प्रमाणे 3, कारवाई करण्यात आली आहे. तसेच बकरीईद च्या अनुषंगाने गोवंश हत्या प्रतिबंधक अधिनियम नुसार जिल्ह्यात प्रभावी मोहीम राबविण्यात आली.यामध्ये जिल्ह्यात 9 गुन्हे दाखल करून कत्तलखान्यात जाणारे अनेक जणावरांची सुटका देखील करण्यात आली. तसेच सोशल मिडीयावर धार्मीक भावना दुखावणारे पोस्ट टाकणारावर सायबर सेल च्या माध्यमातून 16 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच हिंगोली सायबर सेल च्या वतीने 339 सोशल मिडिया गैरवापर करणारे यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी हिंगोली जिल्ह्या पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी जिल्ह्याच्या ईतीहासात पहिल्यांदा एमपीडिए अंतर्गत सहा महिन्यांत तब्बल 18 गुन्हेगारांवर कारवाई करून एक वर्षा करीता जेलमध्ये पाठवले आहे. तर 31 गुन्हेगारांना जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आले आहे. मागील वर्षी आर्म अक्ट अंतर्गत 16 जणांवर कारवाई करण्यात आली होती. तर यावर्षी 70 जणांवर आर्म अक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच तीन अग्नीशस्त्र जप्त करण्यात आली आहे. तसेच अम्ली पदार्थ प्रतिबंध नुसार गांज्यावर ही अनेक कारवाई करून करोडो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर पोलिस दलाच्या वतीने जुगार व दारूबंदी कायद्या अंतर्गत मोठ्या कारवाया करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पोलिस अधीक्षक यांच्या या उत्कृष्ट कामगिरी मध्ये स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी कर्मचारी यांच्या सह सर्व ठाणेदार यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा