(सेलू) मानवी जीवनात आरोग्याला अनंन्यसाधारण महत्त्व असून यशस्वी जीवनाचा मार्ग योगसुत्रातुनच जातो त्यामुळे यशस्वी व स्वास्थपुर्ण जीवनासाठी प्रत्येकाने योगसुत्राचे अनुकरण करावे असे आवाहन सर्वोच्च न्यायालयातील विधीज्ञ ॲड. अतुल डख यांनी केले.
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी, तहसिलदार कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालय पं.स.सेलू व नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्था सचिव प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर, प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार दिनेश झांपले, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, योगाचार्य शिवनारायण मालाणी,विषयतज्ञ रमेश मारेवार,केंद्रप्रमुख मधुकर काष्टे,मुख्याध्यापक नारायण सोळंके, प्रदिप कौसडीकर, उप मुख्याध्यापक संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
नूतन च्या राष्ट्रीय योगासन पटूंची योगासनाच्या विविध आसनांची आकर्षक व चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून पाहुणे व सहभागी विद्यार्थ्यांची मने जिंकली.
शहरातील नूतन विद्यालय, नूतन कन्या प्रशाला, कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय, शारदा विद्यालय, न्यू हायस्कूल, केशवराज बाबासाहेब विद्यालय, यशवंत विद्यालय आदी शाळेतील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवुन योगाभ्यास केला. पाहुण्यांच्या हस्ते उत्कृष्ट क्रीडा संघटक पुरस्कार मिळाल्या बद्दल क्रीडा शिक्षक सतीश नावाडे व राष्ट्रीय योग शिक्षक डी.डी. सोन्नेकर यांचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे, व देविदास सोन्नेकर यांनी केले. तर प्रा. नागेश कान्हेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी पर्यवेक्षक के.के. देशपांडे,प्रा.डॉ.के.के.कदम,प्रशांत नाईक, किशोर ढोके, रावसाहेब पदमपल्ले,राजेंद्र सोनवणे, शरद मगर, रामेश्वर कातकडे, यु.बी. हाळणे, कृष्णा पांचाळ, व्ही. एन. क्षीरसागर, शंशाक पांडे, योगेश ढवारे, भरत रोडगे, सुभाष मोहकरे, अश्विन केदासे , रुपाली साडेगांवकर सौ.अलका धर्माधिकारी, एन.डी.पाटीलआदी शिक्षक वृंदांनी परीश्रम घेतले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा