मुंबई दि.२८: असंघटित महिलांसाठी सरकारची "सन्मान धन योजना' निश्चितच लाभ दायक आहे.मात्र त्या योजनेचा लाभ घेण्यासा ठी महिला कामगारांनी दक्ष रहावयास हवे,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या कामगार आयुक्तालयाच्या अधिकारी स्वरा गुरव यांनी येथे केले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ,घरेलू महिला विभागाच्या वतीने आज आंतरराष्ट्रीय घरेलू दिन संपन्न झाला. या औचित्याने परेलच्या मनोहर फाळके सभागृहात घरेलु प्रशिक्षण शिबिर पार पडले.त्या प्रसंगी कामगार आयुक्तालयाच्या अधिकारी स्वरा गुरव प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.त्या प्रसंगी माजी नगरसेविका रत्ना महाले,राष्ट्रवादी कॉग्रेस महिला विभागाच्या संगीता राऊळ प्रमुख पाहूण्या म्हणून उपस्थित होत्या.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष आणि घरेलु महिला विभागाचे प्रमुख बजरंग चव्हाण यांनी प्रास्ताविक भाषणात महिलांच्या हक्क आणि अधिकाराची माहिती दिली.
या प्रसंगी कामगार आयुक्तालयाच्या अधिकारी स्वरा गुरव आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या, सरकारी योजने अंतर्गत सोयी-सवलतींचा लाभ मिळावायचा असेल तर आधी या योजनेत नोंदणी होणे अगत्याचे ठरते.सरकारच्या वतीने घरेलू कामगारांना लागू असलेल्या अनेक योजनांची त्यांनी आपल्या भाषणात माहिती दिली.
माजी नगरसेविका रत्ना महाले,तसेच संगीता राऊळ यांनी आपल्या भाषणात सांगितले, आता महिलांनी अधिक संघटित होणे महत्त्वाचे आहे.
घरेलू महिला विभाग सहाय्यक सुहास हरमळकर व शैलेश बांद्रे यांचे या समारंभास मोलाचे सहकार्य लाभले.समारंभाला घरेलु महिला तसेच गिरणी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या.
addComments
टिप्पणी पोस्ट करा