भरधाव वेगातील ट्रकने कॉलेज युवतीला चिरडले. मोरगाव बस स्टॉप वरील घटना मुलीचा जागीच मृत्यू. वडगाव, पोटा येथील युवकांनी पोटाबस स्टॉपवर ट्रक पकडला पण चालक फरार.

 


हिमायतनगर। तालुक्यातील मौजे मोरगाव येथील रहिवासी असलेली कुमारी पूजा देवजी चिरकूटलेवाड ही कॉलेज विद्यार्थिनी भोकर हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मोरगाव (पोटा) बस स्टॉप वर कॉलेजला जात असताना भोकर कडून हिमायतनगर कडे जात असलेला भरधाव वेगातील मालवाहतूक ट्रकने मुलींना उडवून चिरडल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी नऊ वाजता घडली घटनेचे वृत्त परिसरातील नागरिकांना कळतात शेकडोच्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले जागृत युवकांनी घटनास्थळावरून प्रसार झालेल्या ट्रकास पोटा बुद्रुक बस स्टॉप वर पकडण्यात आले परंतु ट्रक सोडून पळून गेल्याचे वृत्त आहे.

भोकर हिमायतनगर राष्ट्रीय महामार्ग टकाटक झाला असून अनेक गावालगत हा महामार्ग जात असून अपघाताचे प्रमाणही यावर वाढले आहे भरधाव वेगामध्ये वाहन चालत असल्याने वाहनाचा वेग चालकांच्या ताब्यात राहत नसल्याने ही दुर्दैवी घटना होताना पाहावयास मिळत आहे आज सकाळी नऊ वाजता मोरगाव येथील कुमारी पूजा देवजी चीरकुचिटलेवाड अंदाजे वय सतरा वर्ष ही आपल्या भोकर येथील लक्ष्मण घिसेवाड महाविद्यालयात इयत्ता अकरावीसाठी कॉलेजला पहिल्याच दिवशी जात असताना सकाळी नऊ वाजता भोकर कडून भरधाव वेगाने मालवाहतूक ट्रक एम एच 38 डी 0284 चालकाचे निष्काळजीपणामुळे कॉलेज कुमारी युतीचा ट्रक खाली सापडून जागीच मृत्यू झाला घटनास्थळावरून चालकाने ट्रकसह पोबारा केला घटनेची वृत्त सुजान युवकांनी तातडीने लक्षात घेऊन भ्रमणध्वनीवरून वडगाव येथील तरुणांनी पोटा बु. येतील तरुणाशी संपर्क साधून अपघाती केलेल्या ट्रकला पोटा बुद्रुक बस स्टॉप वर पकडण्यात यश आले परंतु ट्रक सोडून प्रसार झालेला चालक मात्र सापडू शकला नाही.

सकाळीच झालेल्या राष्ट्रीय महामार्गावरील मोरगाव येथील शाळेकरी मुलीच्याअपघाताचे व्रत परिसरात वाऱ्यासारखे पसरतात घटनास्थळी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते गावातील सुजाण नागरिकांनी घटनेचे वर्ततांचा पोलीस स्टेशनला कळवतात तातडीने तामसा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी, बीट जमादार जोगदंड, सूर्यवंशी यांनी घटनास्थळी काकडीने येऊ घटनेचा पंचनामा केला व घटनास्थळावरून मृतदेह भोकर सेवा इच्छेदनासाठी पाठवण्यात आला व पोटा बुद्रुक येथील बस स्टॉप वर अपघात करून थांबलेल्या ट्रकला हिमायतनगर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यासाठी पाठवण्यात आले या घटनेचे वृत्त लिहीपर्यंत ही प्रक्रिया चालू होती. या दुर्दैवी अपघातामुळे मोरगांव गावावर शोक कळा पसरली आहे.

मोरगाव येथील महाकाली देवीचे पुजारी देवजी महाराज यांची एकुलती एक कन्या होती. एकुलत्या एक कन्येचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची वार्ता गावासह परिसरात पसरल्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले तर गावातील अनेकांनी घटनास्थळावर हंबर्डे फोडले हजारोंच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारे देवजी महाराज यांच्यावर आलेले हे दुःख दुर्दैवी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांनी प्रशासना विरुद्ध खेदही व्यक्त केला. राष्ट्रीय महामार्गावर वाहनाचा वाढलेला वेग व बेसुमार पळवणाऱ्या गाड्या बेशिस्त चालकामुळे अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे गाव तिथे गतिरोधक दिल्यास अपघाताच्या वाढत्या प्रमाणाला आळा बसेल असे नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची नोंद घेऊन दिवसेंदिवस राजकीय महामार्गावर होत असलेले वाढते अपघाताला आळा घालण्याचा प्रयत्न करावा असेही अनेकांच्या तोंडून घटनास्थळावर ऐकण्यास मिळत होते.

टिप्पण्या